घरक्रीडायापेक्षा मोठा सन्मान नाही! शिखर धवनला भारतीय संघात १० वर्षे पूर्ण

यापेक्षा मोठा सन्मान नाही! शिखर धवनला भारतीय संघात १० वर्षे पूर्ण

Subscribe

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धवन जगातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक मानला जातो.

सलामीवीर शिखर धवनने भारतीय संघाकडून खेळताना १० वर्षे पूर्ण केली आहेत. धवनने २० ऑक्टोबर २०१० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. मात्र, त्यानंतर त्याने त्याची कामगिरी उंचावली. आता तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा प्रमुख सलामीवीर आहे. त्याने आतापर्यंत भारताकडून १३६ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात ५६८८ धावा केल्या आहेत. १४३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. भारतीय संघाकडून १० वर्षे खेळण्यापेक्षा मोठा सन्मान नाही, अशी प्रतिक्रिया धवनने ट्विटरवरून दिली.

- Advertisement -

आयुष्यभरासाठी आठवणी मिळाल्या

‘भारतीय संघाकडून खेळताना १० वर्षे पूर्ण, माझ्या देशाकडून खेळताना १० वर्षे पूर्ण. यापेक्षा मोठा सन्मान नाही. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना मला आयुष्यभरासाठी आठवणी मिळाल्या आहेत. यासाठी मी सदैव ऋणी राहीन,’ असे धवनने ट्विट केले. धवनने आतापर्यंत ३४ कसोटी, १३६ एकदिवसीय आणि ६१ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळाले नसले, तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो जगातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक मानला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७ शतके आणि २९ अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. सध्या धवन आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या मागील सामन्यात आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले होते. त्याने नाबाद १०१ धावांची खेळी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -