‘काश्मिर आमचा होता आणि आमचाच राहणार’; शिखर धवनने आफ्रिदीला खडसावले

Shikhar Dhawan hits back at Shahid Afridi for his controversial comments on Kashmir
'काश्मिर आमचा होता आणि आमचाच राहणार'; शिखर धवनने आफ्रिदीला खडसावले

पाकिस्तानाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच खडसावले. शाहिद आफ्रिद कोरोनासंदर्भात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलला. तो म्हणाला की, ‘मोदी यांच्या मनात आणि डोक्यात कोरोनापेक्षा मोठा रोग आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावरच मोदी सत्ता चालवत आहे. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे, याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल.’ या विधानानंतर गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनी आफ्रिदीवर टीका केली. आता याबाबत शिखर धवनने देखील आफ्रिदीला चांगलचे खडसावले आहे.

शिखर धवन म्हणाला की, ‘सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूशी सामना करत आहे आणि तुम्हाला अजूनही काश्मिरची पडली आहे. काश्मिर आमचा होता आणि आमचाच राहणार. तुम्ही २० कोटी लोक घेऊन या, आमच्या एक लाखाच्या बरोबर आहे. आता याची तूच बेरीज करत बस.’

यापूर्वी शाहिद आफ्रिदीला गौतम गंभीर सुनावले होत. त्याने शाहिद आफ्रिदीची खिल्ली उडवत, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्ताने लष्करप्रमुख यांच्यावर निशाणा साधला होतो. या पाकिस्तानच्या तिन्ही महाशयांचा उल्लेख त्याने जोकर म्हणून केला आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनासंदर्भातील निष्पक्ष चौकशीच्या ठरावासाठी ६२ देशांसह भारताचा पाठिंबा