घरक्रीडाशिखर धवनला बढती

शिखर धवनला बढती

Subscribe

जागतिक टी-२० क्रमवारी

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि डावखुरा सलामीवीर शिखर धवन यांना आयसीसी टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत बढती मिळाली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत कोहली ११ व्या, तर धवन १३ व्या स्थानावर होता. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत भारत-दक्षिण आफ्रिका मालिका, बांगलादेश-झिम्बाब्वे-अफगाणिस्तान तिरंगी मालिका आणि आयर्लंड-स्कॉटलंड-हॉलंड तिरंगी मालिका यातील कामगिरी लक्षात घेण्यात आली.

कोहलीने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात नाबाद ७२ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याला एका स्थानाची बढती मिळाली असून तो ११ व्या स्थानी पोहोचला. धवनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २ सामन्यांत मिळून ७६ धावा केल्यामुळे त्याला तीन स्थानांची बढती मिळाली. तो ६३९ गुणांसह १३ व्या स्थानी पोहोचला. या क्रमवारीत रोहित शर्मा हा एकच भारतीय फलंदाज अव्वल दहामध्ये आहे. रोहित सध्या आठव्या स्थानी असून त्याच्या खात्यात ६६४ गुण आहेत.

- Advertisement -

भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डीकॉकने दोन सामन्यांत ५२ आणि ७९ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याने ४९ स्थानावरून थेट ३० व्या स्थानी झेप घेतली. गोलंदाजांमध्ये फिरकीपटू तबरेझ शम्सीने अव्वल २० मध्ये प्रवेश केला आहे. या क्रमवारीत भारताचा कुलदीप यादव १४ व्या स्थानावर आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले होते. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी असून त्याच्या खात्यात ७५७ गुण आहेत. अष्टपैलूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल पहिल्या स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -