घरक्रीडाशिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा; स्मृती मानधनासह 'हे' आहेत मानकरी

शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा; स्मृती मानधनासह ‘हे’ आहेत मानकरी

Subscribe

महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणारा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आणि एकलव्य राज्य क्रीडा पुरस्काराचे मानकरी जाहीर..

राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १७ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल सी. विदयासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मल्लखांबसाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना सन २०१७-१८ यावर्षीचा जीवगौरव पुरस्कार तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांना जाहीर करण्यात आला आहे.

सन २०१७-१८ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

- Advertisement -

Shiv Chhatrapati Award announce

Shiv Chhatrapati Award announce 1

- Advertisement -

 

Shiv Chhatrapati Award announce 2

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार १५ जणांना घोषित करण्यात आला आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

अमेय शामसुंदर जोशी (जिम्नॅस्टिक्स), सागर श्रीनिवास कुलकर्णी (जिम्नॅस्टिक्स), गजानन पाटील, पुणे ॲथलेटिक्स, मृणालीनी वैभव औरंगाबादकर (बुध्दीबळ), संजय बबन माने (कुस्ती), डॉ. भूषण पोपटराव जाधव (तलवारबाजी), उमेश रमेशराव कुलकर्णी (तायक्वोंदो), बाळकृष्ण मलप्पा भंडारी (तायक्वोंदो), स्वप्नील सुनील धोपाडे (बुध्दीबळ), निखिल सुभाष कानेटकर (बॅडमिंटन), सत्यप्रकाश माताशरन तिवारी (बॅडमिंटन), दिपाली महेंद्र पाटील (सायकलिंग), पोपट महादेव पाटील (कबड्डी), राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग), डॉ.लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे (वॉटरपोलो) यांना जाहीर झाला असल्याची घोषणा श्री. तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली असून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी  तीन लाख रुपये रोखसन्मानपत्र,स्मृतीचिन्हब्लेझर असे देण्यात येईल. तर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारएकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोखसन्मानपत्रस्मृतीचिन्हब्लेझर असे आहे.

शिवछत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य त्या खेळाडू-संघटक-मार्गदर्शक यांची निवड केली असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात असल्याचे क्रीडा मंत्री तावडे यांनी पुरस्कांची घोषणा करताना पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार निवड समितीमध्ये क्रीडा मंत्री विनोद तावडेशालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णाशालेय शिक्षण आयुक्त यांच्यासह  पदमश्री धनराज पिल्लेपदमश्री प्रभाकर वैद्यअर्जुन पुरस्कारार्थी रचिता मिस्त्रीशिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी प्रदिप गंधेमहाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी जय कवळीपॅरा ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी राजाराम घागअर्जुन पुरस्कारार्थी श्रीरंग इनामदार यांचा समावेश होता. या सर्व सदस्यांनी एकमताने सन 2017-18 या वर्षातील पुरस्कारार्थीची निवड करण्यात आल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -