घरक्रीडाआशियाई स्पर्धेसाठी शिवा थापाची निवड

आशियाई स्पर्धेसाठी शिवा थापाची निवड

Subscribe

एशियाड स्पर्धेचा सुवर्णविजेता अमित पंघाल (५२ किलो) आणि शिवा थापा (६० किलो) यांची पुढील महिन्यात होणार्‍या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा १९ ते २८ एप्रिल या कालावधीत बँकॉक येथे होणार आहे.

अमित प्रथमच आशियाई चॅम्पियनशिपमध्ये उतरणार आहे, तर शिवा थापाला विक्रमी सलग चौथे पदक जिंकण्याची संधी आहे. पंघालने मागच्या महिन्यात बल्गेरियात झालेल्या स्ट्रांजा मेमोरियल स्पर्धेच्या ४९ किलो गटात सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर त्याने जर्मनीत झालेल्या या स्पर्धेत वेगळ्या वजनगटात उतरण्याचा निर्णय घेतला. २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४९ किलो हा वजनी गट असणार नाही. त्यामुळेच अमित वरच्या वजन गटात सहभागी होईल.

- Advertisement -

शिवाने याच महिन्यात फिनलंडमध्ये झालेल्या जीबी बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकत नव्या मोसमाची दमदार सुरुवात केली. विश्वचषक कांस्य विजेत्या मागील ३ आशियाई स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने शिवाने २०१३ मध्ये सुवर्ण, २०१५ मध्ये कांस्य आणि २०१७ मध्ये रौप्यपदक जिंकले.

संघ निवडीबाबत राष्ट्रीय प्रशिक्षक सी.ए. कटप्पा म्हणाले, २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये जे वजनी गट असणार आहेत, त्या वजनी गटांत आशियाई चॅम्पियनशिपमध्ये जे बॉक्सर सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवतील त्यांची या वर्षाअखेर होणार्‍या जागतिक चॅम्पियनशिपसाठी थेट निवड होईल. महिला गटात मेरी कोम ही जागतिक चॅम्पियनशिप तसेच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या स्पर्धेत खेळणार नाही.

- Advertisement -

भारतीय बॉक्सिंग संघ : दीपक सिंग (४९ किलो), अमित पंघाल (५२ किलो), कविंदरसिंग बिश्त (५६ किलो), शिवा थापा (६० किलो), रोहित टोकस (६४ किलो), आशिष (६९ किलो), आशिष कुमार (७५ किलो), ब्रिजेश यादव (८१ किलो), नमन तन्वर (९१ किलो), सतीश कुमार (९१ किलो वरील).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -