घरक्रीडाशोएब अख्तरला मास्टर ब्लास्टरने बनवलं स्टार, २३ वर्षानंतर पाकच्या गोलंदाजाचा मोठा खुलासा

शोएब अख्तरला मास्टर ब्लास्टरने बनवलं स्टार, २३ वर्षानंतर पाकच्या गोलंदाजाचा मोठा खुलासा

Subscribe

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हा पाकिस्तानच्या (Pakistan) सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. खेळाच्या दिवसांमध्ये शोएब मैदानावर वेगवान गोलंदाजीमुळे नेहमीच चर्चेत असायचा. तसेच निवृत्तीनंतरही तो आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतो. मात्र, यावेळी शोएब अख्तरने भारताचा महान खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत (Sachin Tendulkar) मोठा खुलासा केला आहे.

शोएब अख्तर म्हणाला की, अल्लाहनंतर सचिनच आहे, ज्याने मला स्टार बनवले. यासाठी शोएबने २३ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये झालेल्या कोलकाता कसोटी सामन्याचा उल्लेख केला आहे. त्या सामन्यात या गोलंदाजाच्या चेंडूवर सचिन गोल्डन डकवर बाद झाला होता. भारतरत्न सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात अनेक विक्रम केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) सर्वाधिक धावा आणि शतकं (Century) करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.

- Advertisement -

सचिनने मला स्टार बनवले – शोएब अख्तर

शोएब अख्तरने एका स्पोर्ट्स वेबसाईटसोबत संवाद साधला होता. त्यावेळी अख्तर म्हणाला की, मी सकलेन मुश्ताकला विचारले होते की, क्रिकेटचा देव कोणाला म्हटलं जातं. तेव्हा मुश्ताकने मला सचिनचं नाव सांगितलं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, जर मी सचिनला आऊट केलं तर काय होईल?, त्यानंतर मुश्ताक म्हणाला की, त्याने मागील दोन कसोटी सामन्यांत सचिनला आऊट केलं आहे. अशातच मुश्ताक आणि माझ्यामध्ये एका मैत्रीपूर्ण लढाईला सुरूवात झाली. सचिनला आऊट केल्यानंतर मला रातोरात प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे अल्लाहनंतर मला कोणी स्टार बनवलं असेल तर तो सचिन तेंडुलकरच आहे, असं अख्तर म्हणाला.

हेही वाचा : Shoaib Akhtar : तर सचिन तेंडुलकरच्या १ लाखपेक्षा जास्त धावा असत्या, शोएब अख्तरचे मोठं विधान

- Advertisement -

संपूर्ण मैदानात पसरली शांतता – शोएब अख्तर

जेव्हा मी सचिनला आऊट केले त्यानंतर संपूर्ण मैदानात शांतता पसरली होती. तिथे फक्त माझा आवाज येत होता. सचिनला बाद केल्यानंतर मी एक गोष्ट बोललो होतो की, मला अल्लाहनंतर कोणी स्टार म्हटले आहे तर तो तूच आहेस. एवढेच नाही तर सचिनने असे का विचारले, तेव्हा मी त्याला उत्तर दिले की, जर मी तुम्हाला आऊट केलं नसतं तर माझं मन विचलीत झालं असतं. हे म्हटल्यानंतर सचिन म्हणाला की, तुम्ही हे सर्व डिझर्व्ह करता.

शोएब अख्तरची कारकीर्द काय?

शोएब अख्तरने ४६ कसोटी, १६३ एकदिवसीय आणि १५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. कसोटी सामन्यांमध्ये, अख्तरने २५.६९ च्या सरासरीने १७८ इतकी गडी बाद केले आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अख्तरच्या नावावर २४.९७ च्या सरासरीने २४७ विकेट्स आहेत. टी-२० सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर २२.७३ च्या सरासरीने शोएब अख्तरने १९ विकेट्स घेतले आहेत.


हेही वाचा : पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक, रेड्डी-पोनप्पा इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतून बाहेर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -