घरक्रीडाT20 WC 2021: न्यूझीलंड संघाला शोएबचा इशारा, म्हणतो T20 मध्ये बदला घेणार

T20 WC 2021: न्यूझीलंड संघाला शोएबचा इशारा, म्हणतो T20 मध्ये बदला घेणार

Subscribe
पाकिस्तान दौैरा रद्द केल्याचा राग पाकिस्तानच्या क्रिकेट प्रेमींसोबतच खेळाडूंच्या मनातूनही गेला नाही. त्यामुळेच मालिका रद्द केल्याबद्दल सातत्याने विरोधी विधाने समोर येत असतात.  पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पुन्हा एकदा न्यूझीलैंडच्या क्रिकेट संघाला आव्हान दिले आहे. शोएब अख्तरने सांगितले न्यूझीलंडने आमच्या सोबत पाकिस्तान दौरा रद्द जी वागणुक दिली ती अत्यंत चुकीची होती. त्या वागणुकीचे प्रत्युत्तर पाकिस्तानचा संघ सध्या सुरू झालेल्या टी २० विश्व चषकात नक्कीच देईल. (shoaib akhtar statement ahead of Pak vs Nz match going to take revenge of NZ series cancelation in T20 world cup)
भारत आणि पाकिस्तान मध्ये होणाऱ्या टी २० विश्व चषकातील सुपर मॅचपूर्वीच भारतीय संघाचा माजी फिरकीपट्टू हरभजन सिंह आणि शोएब अख्तर हे दोघे एका मंचावर आले होते. त्या दरम्यान एका वृत्तवाहिनीला माहिती देताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने न्यूझीलैंड क्रिकेट संघावर मोठ्या प्रमाणावर शाब्दिक हल्ला चढवला. अनेक आरोपही यानिमित्ताने शोएबने अख्तरने यावेळी केले.
 येत्या २४ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत विरूध्द पाकिस्तानच्या सामन्याचा भारतीय संघावर दबाव जास्त आहे. पण आम्ही आमचा सगळा राग न्यूझीलैंड विरूध्दच्या सामन्यात काढणार आहोत. आमचा राग हा भारतीय संघावर नाही. पण आम्ही न्यूझीलंडच्या संघाला सोडणार नाही. आमच्या मायदेशी होणारे सामने सोडून त्यांचा संघ परतला होता. त्याचा आम्ही बदला घेऊ. अशा तीव्र शब्दांत शोएब अख्तर यांनी न्यूझीलंड क्रिकेट संघाचा समाचार घेतला.
सप्टेंबर २०२१ मध्ये न्यूझीलैंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच विदेशी संघ  मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. पण सामन्याला एक तास शिल्लक असतानाच न्यूझीलंडच्या संघाने मालिका खेळण्यासाठी नकार दिला होता. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली होती की,  सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून देशाने संघाला मायदेशी परतण्यास सांगितले आहे. अशातच न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानमधून काढता पाय घेतला नंतर न्यूझीलैंडचे कित्येक खेळाडू आयपीएल मध्ये देखील खेळले होते.
दौरा रद् केल्यानेच पाकिस्तान आपला सगळा राग न्यूझीलैंडवर काढत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान तसेच माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम यांच्यासहीत अनेक दिग्गजांनी न्यूझीलंडच्या या वागणुकीला चुकीचे म्हटले होते.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -