BAN vs PAK : शोएब मलिकची बांगलादेश दौऱ्यातून माघार, कारण…

पाकिस्तानचा ३९ वर्षीय फलंदाज शोएब मलिक बांगलादेशविरूध्दच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात खेळणार नाही

पाकिस्तानचा ३९ वर्षीय फलंदाज शोएब मलिक सोमवारी होणाऱ्या बांगलादेशविरूध्दच्या तिसऱ्या सामन्यात खेळणार नाही. शोएब आणि सानिया मिर्झाचा मुलगा इजहानची तब्येत खराब आहे. ही बातमी समजताच शोएब ढाकावरून दुबईसाठी रवाना झाला. शोएब आणि सानिया त्यांच्या ३ वर्षीय मुलांसोबत दुबईत राहत आहेत. पाकिस्तानने पहिल्या दोन्हीही टी-२० सामन्यात विजय मिळवून ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. शोएब पहिल्या दोन सामन्यात खेळला होता पण त्याला काही चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याला पहिल्या दोन सामन्यांत मिळून एकही धाव करता आली नाही. मालिकेच्या पहिल्या सामन्यात तो शून्यवर बाद झाला होता मात्र गेल्या काही दिवसापूर्वी तो चांगल्या फॉर्ममध्ये होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, “शोएब मलिक त्याचा मुलगा आजारी असल्याकारणाने सोमवारी बांगलादेशविरूध्दचा तिसरा आणि टी-२० मालिकेचा शेवटचा खेळू शकणार नाही आणि तो सामन्याच्या अगोदरच तो दुबईसाठी रवाना होणार आहे”. शोएब मलिकला सुरूवातीला टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या पाकिस्तानच्या संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र स्पर्धेच्या काही दिवसांपूर्वीच मकसूद दुखापतग्रस्त असल्याने ३९ वर्षीय शोएब मलिकला संघात जागा मिळाली. पाकिस्तानसाठी हा निर्णय खरा ठरला. शोएबने टी-२० विश्वचषकात कित्येक वेळा महत्त्वाची खेळी केली होती. त्याची अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडविरूध्द झालेल्या सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

दरम्यान शोएब मलिकने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानकडून सर्वात जलद अर्धशतक करण्याचा मान पटकावला होता. त्याने स्कॉटलंडविरूध्दच्या सामन्यात फक्त १८ चेंडूत अर्धशकत झळकावले होते. लक्षणीय बाब म्हणजे शोएबला उपांत्यफेरीच्या सामन्यात खेळी करता आली नाही. यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्त होईल अशी चर्चा रंगली होती मात्र त्याने खेळणे चालू ठेवले आहे.

पाकिस्तानचे बांगलादेशसोबत २ कसोटी सामने होणार आहेत

टी-२० मालिका झाल्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश यांमध्ये २६ नोव्हेंबरपासून २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. हि मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हिस्सा असेल. पहिला कसोटी सामना शुक्रवारी तर दुसरा कसोटी सामना ४ डिसेंबरला सुरू होणार आहे.


हे ही वाचा: Sean Whitehead: साऊथ अफ्रिकेच्या स्पिनर गोलंदाजाचा अनोखा विक्रम, १२ षटकांमध्ये संपूर्ण संघालाच केलं ऑल आऊट