घरक्रीडाशोएब मलिकचा वन डे क्रिकेटला बायबाय

शोएब मलिकचा वन डे क्रिकेटला बायबाय

Subscribe

बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामना शुक्रवारी खेळवला गेला.यात सामन्यात बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानने आपल्या वर्ल्डकप मोहिमेचा विजयी समारोप केला. त्याचवेळी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे. सामना संपल्यानंतर शोएबने याची अधिकृत घोषणा केली. मी टी २० सामन्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे ही शोएबने म्हटले आहे. मागील काही वर्षांपासून शोएबची कामगिरी चांगली होत नव्हती. वर्ल्डकपमध्येही शोएब आपली छाप सोडू शकला नाही.

या विश्वचषकानंतर मी निवृत्ती घेणार असल्याचे निश्चित केले होते. यामुळे मला टी २० अधिक चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रीत करता येईल आणि कुटुंबालाही वेळ देता येणार असल्याचे म्हटले. आतापर्यंतच्या कारकिर्दीत सहकार्य केल्याबद्दल शोएबने सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, चाहत्यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

शोएब मलिकने १९९९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. शोएबने २८७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३४.५५च्या सरासरीने ७५३४ धावा केल्या. यामध्ये ९ शतक आणि ४४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याशिवाय त्याने १५८ बळी घेतले. या वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध झालेला सामना हा शोएबचा अखेरचा सामना ठरला. या सामन्यात शोएबला भोपळाही फोडता आला नव्हता. तर, बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातही शोएबला संघात स्थान देण्यात आले नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -