घरक्रीडाShreevats Goswami : भारतीय क्रिकेटपटूकडून मॅच फिक्सिंगचा आरोप; गांगुली यांनी मागवला अहवाल

Shreevats Goswami : भारतीय क्रिकेटपटूकडून मॅच फिक्सिंगचा आरोप; गांगुली यांनी मागवला अहवाल

Subscribe

नवी दिल्ली : 2008 च्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला यष्टिरक्षक फलंदाज श्रीवत्स गोस्वामी याने मॅच फिक्सिंगबाबत आरोप केला आहे. गोस्वामी यांने त्यांच्या फेसबुक पेजवर मोहम्मडन स्पोर्टिंग आणि टाऊन क्लब यांच्यातील सामन्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांने म्हटले की, सामन्यादरम्यान काही खेळाडू ज्या प्रकारे बाद झाले, त्यावरून बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (सीएबी) फर्स्ट डिव्हिजन लीगमधील एक सामना फिक्स झाल्याचे दिसत आहे. गोस्वामीच्या आरोपानंतर कॅबचे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांनी पंचांकडून अहवाल मागवला आहे.

हेही वाचा –Bangalore Blast : कॅफेतील स्फोटाने बंगळुरू हादरले; चौघे जखमी

- Advertisement -

गोस्वामीने फेसबुकवर म्हटले की, कोलकाता क्लब क्रिकेटमधला हा सुपर डिव्हिजन सामना आहे. 2 मोठे संघ अशाप्रकारे खेळत आहेत. इथे काय चालले आहे याची कल्पना आहे का? माझ्या हृदयाच्या खूप जवळ असलेला हा खेळ पाहून मला आज लाज वाटत आहे. मला क्रिकेट आवडते आणि मला बंगालमध्ये खेळायला आवडते, पण हे बघून माझे हृदय आज तुटत आहे. क्लब क्रिकेट हे बंगाल क्रिकेटचे हृदय आणि आत्मा आहे. त्यामुळे कृपया ते खराब करू नका. मला वाटते याला “गॉट अप” क्रिकेट म्हणतात. मीडिया आता कुठे आहे? असा प्रश्नही श्रीवत्स गोस्वामी यांनी विचारला आहे.

- Advertisement -

टाऊन क्लबला सात गुण देण्यासाठी मोहम्मडन स्पोर्टिंगचे फलंदाज जाणूनबुजून बाद होत असल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. हा क्लब टीम इंडियाचे माजी व्यवस्थापक देबब्रत दास यांच्याशी संबंधित आहे, जे सध्याचे CAB सचिव आहेत. 2022 मध्ये इंग्लंड दौऱ्यात दास भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापकही होते. गोस्वामीच्या आरोपानंतर देबब्रत दास यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशा परिस्थितीत CAB चे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांनी पंचांकडून सामन्याचा अहवाल मागवला आहे. आम्ही या विषयावर विचार करण्यासाठी टूर्नामेंट समितीची 2 मार्च रोजी बैठक बोलावली असल्याचेही गांगुली यांनी सांगितले.

हेही वाचा – Gujarat High Court : सरकारी जमीन बळकावण्याचा प्रकार, मंदिराबाबत हायकोर्टाची टिप्पणी

दरम्यान, सॉल्ट लेकमधील 22 यार्ड्स अकादमीमध्ये तीन दिवसीय सामना बुधवारी टाऊन क्लबने सात गुणांसह समाप्त झाला. शाकिब हबीब गांधीच्या 223 धावांनी टाऊन क्लबने 446 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात जॉयजित बसूच्या 100 धावांच्या जोरावर मोहम्मडन स्पोर्टिंगने 281/9 धावा केल्या. मात्र बसू बाद झाल्यानंतर स्पोर्टिंग कोलमडले आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -