घरक्रीडाIND vs NZ Test series : श्रेयस अय्यर २०२१ मध्ये डेब्यू करणारा...

IND vs NZ Test series : श्रेयस अय्यर २०२१ मध्ये डेब्यू करणारा ठरला ५ वा भारतीय; गावस्करांनी सोपवली जबाबदारी

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड मधील पहिल्या सामन्यात भारतीय संघात श्रेयस अय्यरचा कसोटी सामान्यांसाठी डेब्यू झाला आहे

भारत आणि न्यूझीलंडमध्ये कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. दरम्यान भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात भारतीय संघात श्रेयस अय्यरचा कसोटी सामान्यांसाठी डेब्यू झाला आहे. २०२१ मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण करणारा श्रेयस अय्यर पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सध्या भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या सामना कर्णधारपदाची धुरा असलेल्या अजिंक्य रहाणेसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. अशातच के.एल राहुलच्या गैरहजेरीत नंबर ४ साठी युवा खेळाडू श्रेयश अय्यरचा संघात समावेश करण्यात आला आहे. कसोटी मधील आपल्या डेब्यू सामन्यांत अय्यरकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा केली जाते.

पहिल्या सामन्याला सुरुवात होण्याच्या पूर्वसंध्येलाच संघाने डेब्यू सामना खेळत असलेल्या अय्यरचे स्वागत केले. दिग्गज खेळाडू आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी अय्यरला संघाची कॅप सोपवली. त्याची कसोटी सामन्यातील डेब्यू कॅप ३०३ नंबरची राहिली. यापूर्वीच म्हणजे ३०२ नंबरची कॅप देऊन फिरकीपटू अक्षर पटेलचा याच वर्षी डेब्यू झाला होता.

- Advertisement -

२०२१ मध्ये ५ भारतीय खेळाडूंचा कसोटी सामन्यांसाठी डेब्यू

२०२१ च्या चालू वर्षी ५ भारतीय खेळाडूंचा कसोटी सामन्यांसाठी डेब्यू झाला आहे. यामध्ये श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि टी नटराजन या खेळाडूंचा समावेश आहे. २०२१ मध्ये नवदीप सैनीचा सर्वात अगोदर डेब्यू झाला होता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर सिडनी मध्ये कसोटी सामना खेळला होता.


हे ही वाचा: इसिस काश्मीरकडून गौतम गंभीरला धमकी

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -