घरक्रीडाIPL 2021 : श्रेयस अय्यरला दुखापत; दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदासाठी 'हे' तीन दावेदार 

IPL 2021 : श्रेयस अय्यरला दुखापत; दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदासाठी ‘हे’ तीन दावेदार 

Subscribe

यंदा आयपीएल स्पर्धेला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. इंग्लंडच्या डावात जॉनी बेअरस्टोने मारलेला फटका त्याने सूर मारून अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी त्याचा डावा खांदा दुखावला. त्यानंतर भारतीय संघाचे फिजिओ त्याला घेऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. त्याला झालेली दुखापत गंभीर असून तो एकदिवसीय मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांत खेळणार नाही. तसेच तो आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना किंवा संपूर्ण स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये श्रेयस दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करतो. त्यामुळे त्याला दुखापत होणे हा दिल्लीसाठी धक्का आहे. मात्र, तो मैदानात पुनरागमन करेपर्यंत दिल्लीला नव्या कर्णधाराची नेमणूक करावी लागणार आहे. दिल्लीच्या कर्णधारपदासाठी तीन प्रमुख दावेदार असू शकतील.

रिषभ पंत – भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने मागील काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तसेच त्याने मागील मोसमात दिल्लीचे उपकर्णधारपद भूषवले होते. त्यामुळे श्रेयसच्या अनुपस्थितीत पंत दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळू शकेल. पंतला आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव नसला तरी त्याने २०१७-१८ रणजी मोसमात दिल्लीचे नेतृत्व केले होते.

- Advertisement -

अजिंक्य रहाणे – मुंबईकर अजिंक्य रहाणेला आयपीएलच्या मागील मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून फारसे सामने खेळता आले नाही. मात्र, त्याआधीच्या मोसमांत तो राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदी होता. तसेच यावर्षीच्या सुरुवातीला त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे आता त्याची दिल्लीच्या कर्णधारपदी निवड होऊ शकेल.

स्टिव्ह स्मिथ – दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या खेळाडू लिलावात स्टिव्ह स्मिथला खरेदी केले, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते. मात्र, स्मिथला खरेदी करण्याचा निर्णय आता दिल्लीला फायदेशीर ठरू शकेल. स्मिथने याआधी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व केले आहे. तो कर्णधार असताना राजस्थानने २७ पैकी १५ सामने, तर पुण्याने १५ पैकी १० सामने जिंकले. त्यामुळे आता दिल्लीचे नेतृत्व करण्यासाठी तो दावेदार आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -