घरक्रीडावारसलेन, विजय क्लब विजयी सलामी

वारसलेन, विजय क्लब विजयी सलामी

Subscribe

श्री सिद्धेश्वर मंडळ कबड्डी स्पर्धा

वारसलेन, विजय क्लब या संघांनी श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ आयोजित मनसे चषक कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रभादेवीच्या राजाराम साळवी क्रीडांगणावर सुरु झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात विजय क्लबने भवानीमाता क्रीडा मंडळावर ५१-२७ अशी मात केली. सुधीर सिंगने एकाच चढाईत ३ गडी टिपत विजय क्लबला मध्यंतराला ३०-१५ अशी आघाडी मिळवून दिली. सुधीरला ओमकार येनापुरे, रोशन भूतीता यांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे विजय क्लबने हा सामना ५१-२७ असा २४ गुणांच्या फरकाने जिंकला.

वारसलेन आणि गोल्फादेवी मंडळ यांच्यातील सामना फारसा चुरशीचा झाला. सुवर्ण चढाईच्या डावात वारसलेनने गोलफादेवी मंडळाचा ३९-३८ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. सोहम, साईस नार्वेकर यांच्या झंजावाती चढायांमुळे वारसलेनने मध्यंतराला १८-१३ अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात मात्र अखेरच्या काही मिनिटांत गोल्फादेवीच्या जयेश वारसेने एकाच चढाईत ३ बळी घेत सामना बरोबरीत आणला.

- Advertisement -

नियमित सामन्याअखेरीस दोन संघांत ३३-३३ अशी बरोबरी होती. त्यामुळे ५-५ चढायांचा डाव खेळवण्यात आला, पण यातही ३८-३८ अशी बरोबरी झाली. त्यामुळे सामन्याचा विजेता ठरवण्यासाठी सुवर्ण चढाईचा डाव खेळवण्यात आला. वारसलेनच्या सोहम नार्वेकरने चढाईत गडी टिपत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

विकासची जय दत्तगुरुवर मात
श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ आयोजित मनसे चषक कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विकासाने जय दत्तगुरुला ३४-२६ असे पराभूत केले. अवधूत शिंदे, विराज सिंग यांच्या चढाई-पकडीच्या खेळाच्या जोरावर विकासाने दत्तगुरुवर लोण देत विश्रांतीला १५-८ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात मात्र जय दत्तगुरुच्या ऋतिक नागलेने एका चढाईत विकासचे ५ गडी टिपत सामन्यात रंगत आणली. परंतु, अवधूत शिंदे पुन्हा एकदा आपला खेळ उंचावत विकास संघाला हा सामना जिंकवून दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -