घरक्रीडादे घुमाके! शुबमन गिलच्या शतकी खेळीने मास्टर ब्लास्टरचा मोडला विक्रम

दे घुमाके! शुबमन गिलच्या शतकी खेळीने मास्टर ब्लास्टरचा मोडला विक्रम

Subscribe

टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात आज तिसरा सामना रंगत आहे. दोन सामन्यात टीम इंडियाने बाजी मारल्यानंतर तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला व्हाईट वॉश करण्याच्या प्रयत्नात असेल. सलामीवीर शिखर धवनने दमदार खेळी करत आपला फॉर्म कायम राखला. तर लोकेश राहुलला नेहमीप्रमाणे मोठी खेळी करता आली नाही. परंतु शुबमन गिलच्या शतकी खेळीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

शुबमन गिल आणि इशान किशान यांनी १४० धावांची भागिदारी केली. इशान किशन दुसरे अर्धशतक झळकावत रनआऊट झाला. परंतु गिलने एकदिवसीय सामन्यातील पहिले शतक पूर्ण केले आहे. तर हिटमॅन रोहित शर्माने २०१० मध्ये पहिले शतक ठोकले होते. लोकेश राहुलने २०१६ मध्ये पहिले शतक झळकावले होते. राहुलनंतर गिलने आज उत्तम कामगिरी करत शतकीय खेळी केली आहे.

- Advertisement -

गिलने सचिन तेंडुलकरचे २१ आणि २३ वर्षांपूर्वीचे दोन विक्रम मोडले आहे. ब्रॅड इव्हान्सने कर्णधार लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला. त्यामुळे टीम इंडियाला ६३ धावांवर पहिला धक्का बसला. शिखर धवनला ६८ चेंडूंत ४० धावांवर इव्हन्सनेच माघारी पाठवले. वेस्ट इंडिज दौऱ्यावर शुबमनला ९८ धावांवर नाबाद असूनही पावसामुळे शतक पूर्ण करता आले नव्हते. परंतु त्याने आज शतक पूर्ण करत सल भरून काढली.

टीम इंडियाकडून शतक झळकावणारा गिल हा १०२ आणि जगातला १०२२ वा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने यापूर्वी २३ व्या वर्षांत २८ दिवसांचा सामन्यात झिम्बाब्वेत शतक झळकावले होते. शुबमनने १२३ धावा करताच हरारे येथे सचिन तेंडुलकरने २००१ मध्ये नोंदवलेला १२२ धावांची विक्रम तुटला. हरारे येथे टीम इंडियाची फलंदाजी सर्वोत्तम ठरली होती.

- Advertisement -

हेही वाचा : दोन सामने जिंकणाऱ्या भारताचा झिम्बाब्वेबरोबर रंगणार तिसरा सामना, कधी होणार?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -