घरक्रीडाShubman Gill : "दुसऱ्या डावात इंजेक्शन घेऊन केली फलंदाजी"; शतकवीर शुभमन गिलकडून...

Shubman Gill : “दुसऱ्या डावात इंजेक्शन घेऊन केली फलंदाजी”; शतकवीर शुभमन गिलकडून खुलासा

Subscribe

विशाखापट्टणम : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडला दुसऱ्या डावात 399 धावांचे लक्ष दिले होते, मात्र त्यांचा डाव 292 धावांवर आटोपला आणि भारताने मालिकेत बरोबरी साधली आहे. भारताने 106 धावांनी सामना जिंकला. मात्र अशातच भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने खुलासा केला की, त्याने दुसऱ्या डावात इंजेक्शन घेऊन फलंदाज केली. (Injected batting in the second innings Disclosure from centurion Shubman Gill)

हेही वाचा – IND Vs ENG: बुमराह 9 विकेट्स घेऊनही ‘या’बाबतीत ठरला अपयशी

- Advertisement -

शुभमन गिल गेल्या काही काळापासून मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरत होता. मात्र त्याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. भारताच्या विजयानंतर प्रसारकांशी बोलताना शुभमन गिल म्हणाला की, “दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यापूर्वी मी इंजेक्शन्स घेतले होते. कारण पहिल्या डावात माझ्या बोटावर चेंडू लागला होता.

- Advertisement -

इंग्लंडच्या पहिल्या डावात शॉर्ट मिड-विकेटवर रेहान अहमदचा झेल घेताना गिलच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजीला येताना इंजेक्शन घेत होते. यानंतर त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना चांगली सुरुवात केली. त्याने सुरुवातीला 60 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने अर्धशतक केले. यानंतर त्याने 132 चेंडूंचा सामना करताना आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकारचा समावेश आहे. त्याने  बाद होण्यापूर्वी 147 चेंडूत 104 धावांची खेळी केली.

हेही वाचा – Nashik Crime : 108 बोकडांचा बळी, पार्टी आली अंगलट; आयकरच्या छाप्यात 850 कोटींचं घबाड सापडलं

भारताकडून इंग्लंडचा 106 धावांनी पराभव

दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावा करून सर्वबाद झाला. भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली होती. गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि इंग्लंडला 399 धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंड संघाचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. यासह भारताने दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता दोन्ही संघामधील तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -