घरक्रीडाShubman Gill पुढील विराट कोहली बनणार; विश्वचषकाआधी भारताच्या माजी खेळाडूचं मोठे विधान

Shubman Gill पुढील विराट कोहली बनणार; विश्वचषकाआधी भारताच्या माजी खेळाडूचं मोठे विधान

Subscribe

Shubman Gill : 24 वर्षीय शुभमन गिल अवघ्या काही वर्षात भारताचा स्टार खेळाडू बनला आहे. शुभमन गिल धावांचा पाऊस पाडत असून सध्या तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आशिया चषकातही त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे हा फॉर्म कायम ठेवत आगामी विश्वचषकातही शुभमन गिलकडून भारतीय संघाला अपेक्षा असणार आहेत. शुभमन गिलच्या फलंदाजीचे सर्वजण चाहते असून यामध्ये आजी-माजी खेळाडूंचाही समावेश आहे. अशाताच भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना याने गिलचे कौतुक करताना मोठे वक्तव्य केले आहे. शुभमन गिल भारताचा पुढील विराट कोहली बनणार असे त्याने म्हटले आहे. (Shubman Gill next Virat Kohli A big statement suresh raina World Cup 2023)

हेही वाचा – India VS Australia वनडे मालिका बघायचीय तर येथे पहा; सर्व माहिती एका क्लिकर

- Advertisement -

शुभमन गिलबद्दल बोलताना सुरेश रैना म्हणाला की, तो विश्वचषक स्पर्धेत सर्वात महत्त्वाचा खेळाडू असेल. मला माहित आहे की, त्याला सुपरस्टार बनायचे आहे आणि पुढचा विराट कोहली बनायचा आहे. तो सध्या ज्या फॉर्ममध्ये, ज्या गतीने खेळतोय, ज्या प्रकारे धावा करतोय. त्यामुळे फिरकीपटूंना कळत नाही की, त्याला कुठे गोलंदाजी करायची. वेगवान गोलंदाजांनी टाकलेला चेंडू स्विंग झाला नाही शुभमन गिल सरळ किंवा फ्लिकसह खरोखरच चांगला खेळू शकतो.

रोहित शर्माने 2019 च्या विश्वचषकात जी कामगिरी केली होती, तशीच कामगिरी तो यंदा भारतात होणाऱ्या विश्वचषकात करू शकतो. त्याला फलंदाजीसाठी 50 षटके मिळतील, त्यामुळे त्याच्या फलंदाजीसाठी हा टेकऑफ पॉइंट आहे. मला वाटते की, तो जन्मजात नेतृत्वकर्ता आहे आणि तो आपल्या खेळात ते दाखवतो, असे कौतुक सुरेश रैना याने जिओ सिनेमाच्या एका कार्यक्रमात केले.

- Advertisement -

हेही वाचा – ये बात… मोहम्मद सिराजच जगात नंबर वन; नामांकित बॉलरलाही टाकले मागे

वेस्ट इंडिजविरुद्ध खराब कामगिरीनंतरही गिलला विश्वचषक स्पर्धेत संधी

शुभमन गिल मागील दीड वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला मध्यंतरी संघर्ष करावा लागला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आणि पाच टी-20 सामन्यांमधील खराब कामगिरीमुळे गिलवर चाहत्यांकडून टीका झाली होती. मात्र आशिया चषकात त्याने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे तो आता वेस्ट इंडिजविरुद्ध 50 किंवा 100 धावा आरामात करू शकतो. गिलची फलंदाजीची शैली विराट कोहलीसारखीच असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे त्याला 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात प्रमुख खेळाडूंच्या यादीत त्याला संधी देण्यात आली. गिल हा नेहमीच संघ व्यवस्थापनाच्या नजरेत असल्यामुळे त्याची बिनदिक्कतपणे विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असल्याचे सुरेश रैनाचे मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -