घरक्रीडासिलेसियान बॉक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत झेप, कांस्यपदक निश्चित

सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धा : मेरी कोमची उपांत्य फेरीत झेप, कांस्यपदक निश्चित

Subscribe

भारताच्या बॉक्सिंगपटू मेरी कोम, सरिता देवी, रितू अगरवाल यांच्यासह लवलीना बोगरेहैनने उपांत्य फेरीत पोहोचत आपले पदक निश्चित केले आहे.

सध्या पोलंडमध्ये सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धा सुरू असून यात भारताच्या महिला बॉक्सिंगपटू अप्रतिम कामगिरी करताना दिसून येत आहेत. भारताच्या तिन्ही बॉक्सिंगपटू मेरी कोम,सरिता देवी आणि रितू अगरवाल यांनी उत्तम खेळ दाखवत उपांत्य फेरीत जागा मिळवत कांस्यपदक निश्चित केले आहे.

- Advertisement -

अशी मिळवली उपांत्य फेरीत जागा

सर्वात आधी भारताच्या सरिता देवीने पहिल्या फेरीतील कझाकिस्तानच्या एझान खोजाबेकोला नमवत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला त्यानंतर तिने चेक रिपब्लिकच्या एलिना जेचीवर ५-० च्या फरकाने मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. सरिता आता उपांत्य लढतीत कझाकिस्तानच्या करिना इब्रागिमोवाशी लढणार आहे. तिने हे विजय ६० किलो वजनी गटात मिळवले आहेत.

sarita devi
सरिता देवी

दुसरीकडे भारताची बॉक्सिंगपटू स्टार मेरी कोम हिने ४८ किलो वजनी गटातील सामना अनिर्णीत करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. तसेच ५१ किलो वजनी गटात भारताच्या रितू अगरवालने रशियाच्या स्वेतलाना रोसजाला ४-१ च्या फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर दुसरीकडे ६९ किलो वजनी गटात भारताच्या लवलीना बोगरेहैनने चेक रिपब्लिकच्या मार्टिना श्मोरानजोवाला मात देत उपांत्य फेरी गाठली आहे.

- Advertisement -

जुनियर गटातही भारतीयांची चमक

स्पर्धेच्या जुनियर गटातील सामन्यात ७० किलो गटात राज साहीबाने पोलंडच्या बार्बरा मार्चीकोवस्कावर ५-० च्या फरकाने विजय मिळवला आहे तर ७५ किलो गटात नेहाने दारीया पराडाला नमवले आहे. मात्र ८० किलो गटात कोमलला मात्र मार्टीनासमोर ३-२ च्या फरकाने पराभूत व्हावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -