कोलंबो : भारतीय संघाने प्रतिस्पर्धी श्रीलंका संघाला अवघ्या 50 धावांवर रोखत श्रीलंकेवर 10 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाच्या मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी केली. त्याने सात षटकांत केवळ 21 धावा देत सहा गडी बाद केले. त्यामुळे सिराजला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. मात्र, त्याने या सामन्यात केवळ धोकादायक गोलंदाजीच केली नाही तर त्याच्या बक्षिसाची रक्कम मैदानावरील खेळाडूंना सुपूर्द करून चाहत्यांची मने जिंकली. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Siraj who became the man of the match did something like this that won everyones hearts Read What did he do)
सिराजला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. त्याला बक्षीस म्हणून सुमारे 4.15 लाख रुपये मिळाले. सिराजने औदार्य दाखवत ही रक्कम मैदानावर काम करणाऱ्यांना सुपूर्द केली.
काय म्हणाला मोहम्म सिराज
सामना संपल्यानंतर सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेला मोहम्मद सिराज म्हणाले की, हा पुरस्कार मैदानी खेळाडूंना जातो. त्यांच्याशिवाय ही स्पर्धा शक्यच झाली नसती. आशिया खंडातील बहुतांश सामने पावसाने विस्कळीत केले. या कालावधीत मैदानधारकांना पुन्हा पुन्हा कव्हर आणावे लागले. या स्पर्धेच्या आयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका यांनी त्याचे कौतुक केले.
हेही वाचा : भारतीय संघाने कोरले आठव्यांदा आशिया चषकावर नाव; श्रीलंकेचा लाजीरवाणा पराभव
शास्त्री म्हणाले आज तू काय खालले?
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजला रवि शास्त्री यांनी काहीसे मिश्किल प्रश्न विचारले. ते विचारले की, आज बिर्याणी खाल्लीस का? यावर सिराज म्हणाला की, आज बिर्याणी नाही खालली. त्यानंतर तो त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलला. सिराज म्हणाला की, मी बऱ्याच दिवसांपासून चांगली गोलंदाजी करत आहे. जेव्हा वेगवान गोलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ असतो तेव्हा त्याचा संघाला फायदा होतो. ही माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी आहे असेही उत्तर त्याने समालोचक रवी शास्त्री यांना दिले.
हेही वाचा : सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी पुढे केला महिला आरक्षणाचा मुद्दा; विशेष अधिवेशन ठरणार वादळी
सिराजने वकार युनूसचा विक्रम मोडला
सिराजने 21 धावांत सहा विकेट घेत श्रीलंकेविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला. सिराजने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूसला मागे सोडले. वकारने 1990 मध्ये शारजाहच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध 26 धावांत सहा विकेट घेतल्या होत्या.