घरक्रीडाSL vs BAN : करुणरत्ने, धनंजयची त्रिशतकी भागीदारी; हसी-मार्शला टाकले मागे 

SL vs BAN : करुणरत्ने, धनंजयची त्रिशतकी भागीदारी; हसी-मार्शला टाकले मागे 

Subscribe

श्रीलंकेला अजून पहिल्या डावात आघाडीसाठी २९ धावांची गरज आहे.

कर्णधार दिमुथ करुणरत्ने आणि धनंजय डी सिल्वाच्या त्रिशतकी भागीदारीमुळे श्रीलंकेने पहिल्या कसोटीत बांगलादेशला दमदार उत्तर दिले. बांगलादेशच्या ५४१ धावांचे उत्तर देताना श्रीलंकेची चौथ्या दिवसअखेर ३ बाद ५१२ अशी धावसंख्या होती. श्रीलंकेने चौथ्या दिवशी एकही विकेट गमावली नाही. कर्णधार करुणरत्नेने ४१९ चेंडूत २५ चौकारांच्या मदतीने नाबाद २३४ धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिलेवहिले द्विशतक ठरले. करुणरत्ने चारही दिवस मैदानात आहे. त्याने आधी १३ तास क्षेत्ररक्षण केले, तर तो ११ तास फलंदाजी करत आहे.

३२२ धावांची भागीदारी

करुणरत्ने आणि धनंजय यांनी चौथ्या दिवशी अप्रतिम फलंदाजी केली. या दोघांनी ३२२ धावांची भागीदारी रचली. श्रीलंकेत चौथ्या विकेटसाठी ही सर्वोच्च भागीदारी ठरली. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्श आणि मायकल हसीच्या नावे होता. या दोघांनी २०११ मध्ये २५८ धावांची भागीदारी रचली होती.

- Advertisement -

करुणरत्ने २३४ धावांवर नाबाद

हा विक्रम मोडताना करुणरत्ने आणि धनंजय यांनी त्रिशतकी भागीदारी रचली. दिवसअखेर करुणरत्ने २३४ धावांवर, तर धनंजय १५४ धावांवर नाबाद होता. श्रीलंकेला अजून पहिल्या डावात आघाडीसाठी २९ धावांची गरज असून अखेरच्या दिवशी हा सामना अनिर्णित राहण्याची दाट शक्यता आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -