घरक्रीडा'त्याला' कानशिलात लगावल्याचा मला आजही होतोय पश्चाताप; हरभजनकडून चुकीची कबुली

‘त्याला’ कानशिलात लगावल्याचा मला आजही होतोय पश्चाताप; हरभजनकडून चुकीची कबुली

Subscribe

भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंहने वेगवान गोलंदाज श्रीसंत याच्या कानशिलात लगावली होती. इंडियन प्रिमीयर लीग आयपीएलमध्ये हरभजनने श्रासंतच्या कानशिलात लगावली होती.

भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंहने (Harbhajan Sigh) वेगवान गोलंदाज श्रीसंत याच्या कानशिलात लगावली होती. इंडियन प्रिमीयर लीग आयपीएलमध्ये हरभजनने श्रासंतच्या (sreesanth) कानशिलात (Slap) लगावली होती. मात्र, या घटनेला १४ वर्षे झाली असून आता हरभजनने आपल्याला पश्चाताप होत असल्याचे सांगितले. तसेच, आपल्या चुकीची कबूली दिली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान दिलेल्या मुलाखतीत त्याने १४ वर्षापूर्वीचा किस्सा सांगितला. “श्रीसंतने खूप नौटंकी केली होती. पण मी असे करायला नको हवे होते. ही माझीच चूक होती. मी माझ्या चुकांमधून शिकलो आहे. त्या दिवशी जे घडलं ते खुप चुकीच घडले. खेळात भावना नेहमीच तुमच्यासोबत असतात, पण त्यावर नियंत्रण ठेवावे लागते”, असे हरभजन म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा – हरभजन सिंगची राजकीय इनिंग सुरू, आम आदमी पार्टी राज्यसभेवर पाठवणार

नेमकी घटना काय?

- Advertisement -

माजी भारतीय ऑफ स्पिनरन हरभजन सिंहने १४ वर्षापूर्वी म्हणजेच २००८ मध्ये आयपीएलमध्ये (IPL) वेगवान गोलंदाज श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. आयपीएलचे हे पहिलेच वर्ष होते. त्यावेळी सामना संपल्यानंतर काही कारणावरून झालेल्या वादामुळे हरभजनने त्याच्या कानाखाली मारली. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार कॅमेराच कैद करण्यात आला होता.

दरम्यान, हरभजन सिंग हा मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू गोलंदाज होता, तर श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज होता. या घटनेनंतर हरभजनला संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. याशिवाय भज्जीवर ५ वनडे सामन्यांसाठीही बंदी घालण्यात आली होती.

हेही वाचा – 2011 वर्ल्डकप धोनीने जिंकला? मग बाकी खेळाडू लस्सी पीत होते ? हरभजन सिंह भडकला

श्रीसंतने भारतासाठी २७ टेस्ट मॅच व्यतिरीक्त ५३ वनडे आणि १० टी २० खेळले आहेत. श्रीसंतच्या नावावर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये १६९ विकेट्स आहेत. विशेष म्हणजे २००७ मध्ये टी २० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा श्रीसंत भाग होता. तसेच, २०११ मध्ये भारतीय संघाने विश्वचषक जिंकला त्यावेळी श्रीसंत भारतीय संघाचा भाग होता.


हेही वाचा – इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूचा ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ पुरस्काराने गौरव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -