घरक्रीडास्लो-ओव्हर रेटमुळे बंदी नाही!

स्लो-ओव्हर रेटमुळे बंदी नाही!

Subscribe

षटकांची गती राखली नाही, तर बंदीची कारवाई होण्याची चिंता यापुढे आंतरराष्ट्रीय संघांच्या कर्णधारांना करावी लागणार नाही. नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. षटकांची गती न राखल्यास कर्णधारांवर बंदी घालण्याऐवजी संघाचे गुण कमी करण्यात येणार आहेत. तसेच संपूर्ण संघालाच दंडही होणार आहे. आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेपासून आयसीसीचे हे नवे नियम लागू होणार आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा २०१९ ते २०२१ या कालावधीत पार पडणार आहे. १ ऑगस्टपासून होणार्‍या अ‍ॅशेस मालिकेपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. आयसीसी क्रिकेट समितीने षटकांची गती न राखण्याबाबतच्या नव्या नियमांची बोर्डाकडे शिफारस केली होती.

आयसीसीने नियम बदलाबाबत त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील सामन्यांमध्ये जे संघ षटकांची गती राखण्यात अपयशी ठरतील, त्यांचे प्रत्येक षटकामागे दोन गुण कमी करण्यात येतील. षटकांची गती राखली नाही म्हणून कर्णधारांवर बंदीची कारवाई करण्यात येणार नाही. षटकांची गती न राखण्याला सर्वच खेळाडू जबाबदार असल्याने त्यांच्यावर समान दंडात्मक कारवाई होईल. कर्णधाराला इतर खेळाडूंपेक्षा जास्त दंड होणार नाही.

- Advertisement -

आयसीसीच्या आधीच्या नियमानुसार, एखाद्या संघाला एका वर्षात दोन वेळा षटकांची गती राखण्यात अपयश आल्यास त्या संघाच्या कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात येत असे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -