घरक्रीडाप्रसाद दिंडेची अष्टपैलू कामगिरी

प्रसाद दिंडेची अष्टपैलू कामगिरी

Subscribe

एसएमबीटी मान्सून लीग क्रिकेट

जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित एसएमबीटी मान्सून लीग स्पर्धेतील १६ वर्षांखालील गटात प्रसाद दिंडेच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर २२ यार्ड्स संघाविरुद्धच्या सामन्यात एनडीसीए संघाने पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले. तसेच १४ वर्षांखालील गटात एनडीसीए एच्या आयुष ठक्करनेही (९ बळी, नाबाद ३० धावा) अष्टपैलू कामगिरी केली.
या स्पर्धेतील १६ वर्षांखालील गटामध्ये २२ यार्ड्सविरुद्धच्या सामन्यात एनडीसीए संघाने प्रथम फलंदाजीत २०७ धावा केल्या. त्यांच्याकडून प्रसाद दिंडेने नाबाद १०८ धावांची खेळी केली. याचे उत्तर देताना २२ यार्ड्सचा डाव २०६ धावांत आटोपला. दिंडेने गोलंदाजीत आपली चमक दाखवत ३ गडी बाद केले. त्यामुळे एनडीसीए संघाने पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले.

१६ वर्षांखालील गट –

एनडीसीए : २०७ धावा (प्रसाद दिंडे नाबाद १०८, आयुष ठक्कर ३६; हर्षवर्धन चव्हाण ३ बळी) वि. २२ यार्ड्स : २०६ धावा (देवांश पाटील ७९; प्रसाद दिंडे ३ बळी). [एनडीसीए संघाने पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले]

- Advertisement -

आई तुळजाभवानी बी : सर्वबाद ६५ (निर्मित शाह ५ बळी, निखिल खत्री ३ बळी) आणि सर्वबाद ७६ (निखिल खत्री ६ बळी, निर्मित शाह २ बळी) पराभूत वि. एसजीसीए बी : सर्वबाद २११ (यश हगावणे ४१, तेजस जाधव ३४; आयुष कोल्हे ६ बळी).

एनडीसीए गर्ल्स : सर्वबाद ११४ (प्रिया सिंग २५; वेदांत पूरकर ५ बळी) वि. अर्जुन क्रिकेट अकादमी : सर्वबाद ११२ (वेदांत पूरकर ३२; लक्ष्मी यादव ४ बळी, प्रिया सिंग ४ बळी). [एनडीसीए गर्ल्सने पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले]

- Advertisement -

१४ वर्षांखालील गट –

लाँरेंटियन : सर्वबाद १०४ (कौस्तुभ वानखेडे ३८; आयुष ठक्कर ५ बळी) आणि सर्वबाद ४८ (आयुष ठक्कर ४ बळी, प्रसाद दिंडे ३ बळी) पराभूत वि. एनडीसीए ए : सर्वबाद ५७ (साहिल पगार ४ बळी) आणि ७ बाद ९८ (आयुष ठक्कर नाबाद ३०; अजिंक्य अहिरे २ बळी).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -