घरक्रीडाएसएमबीटी मान्सून लीग

एसएमबीटी मान्सून लीग

Subscribe

साहिल पारेखच्या अष्टपैलू कामगिरीमुळे नाशिक क्रिकेट अकादमीने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि एसएमबीटी मेडिकल कॉलेज आयोजित एसएमबीटी मान्सून लीग १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम फेरीत यूएसजी संघावर एक डाव आणि ७३ धावांनी विजय मिळविला.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या दोन दिवसीय अंतिम सामन्यामध्ये नाशिक क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना साहिल पारेखने १०२ चेंडूत २९ चौकारासह केलेल्या १५१ धावांच्या जोरावर ३७४ धावा केल्या. त्याला अंकित गायकवाडने ७७ धावा तर देवांग शिंदेने ५१ धावा करत चांगली साथ दिली. यूएसजीच्या तेजस माळोदे, ध्रुव पेखळे आणि श्रावण चंद्रात्रे यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

- Advertisement -

याला उत्तर देताना यूएसजीचा पहिला डाव १५१ धावांत आटोपला. साहिल पारेखने गोलंदाजीतही आपली कमाल दाखवत १९ धावा देत ६ गडी बाद केले. नाशिक क्रिकेट अकादमीने यूएसजी संघाला फॉलोऑन दिला. दुसर्‍या डावात यूएसजी संघ १४९ धावांवर गारद झाला. अंकित अहिरेने एकाकी लढत देत ८९ धावा केल्या. नाशिक क्रिकेट अकादमीकडून आप्पासाहेब कांदळकर, आयुष गागरे आणि अनिकेत गायकवाड यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -