घरक्रीडास्मिथचे एकाच सामन्यात दुसरे शतक; ऑस्ट्रेलियाला त्रिशतकी आघाडी

स्मिथचे एकाच सामन्यात दुसरे शतक; ऑस्ट्रेलियाला त्रिशतकी आघाडी

Subscribe

जवळपास दीड वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसर्‍या डावातही शतकी खेळी केली. पहिल्या डावात एकाकी झुंज देत १४४ धावांची खेळी करणार्‍या दुसर्‍या डावात १४२ धावा केल्या. त्याला मॅथ्यू वेडने शतक ठोकत चांगली साथ दिल्याने या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची दुसर्‍या डावात ९५ षटकांनंतर ५ बाद ३९३ अशी धावसंख्या होती. त्यांच्याकडे ३०३ धावांची आघाडी होती.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या २८४ धावांचे उत्तर देताना इंग्लंडने पहिल्या डावात रोरी बर्न्सच्या शतकामुळे ३७४ धावा करत ९० धावांची आघाडी मिळवली. डेविड वॉर्नर (७), कॅमरून बँक्रॉफ्ट (८) आणि उस्मान ख्वाजा (४०) लवकर माघारी परतल्याने तिसर्‍या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दुसर्‍या डावात ३ बाद १२४ अशी धावसंख्या होती. स्मिथ ४६ आणि ट्रेव्हिस हेड २१ धावांवर नाबाद होता. चौथ्या दिवशी पुढे खेळताना स्मिथ आणि हेडने चांगली फलंदाजी सुरु ठेवली. या दोघांनीही चांगली फलंदाजी सुरु ठेवली. स्मिथने ६९, तर हेडने १११ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, ५१ धावांवर असताना हेडला बेन स्टोक्सने यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. त्याने आणि स्मिथने चौथ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली.

- Advertisement -

हेड बाद झाल्यावरही स्मिथने दमदार फलंदाजी सुरु ठेवली. त्याला कसोटी संघात पुनरागमन करणार्‍या वेडने उत्तम साथ दिली. या दोघांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ब्रॉड टाकत असलेल्या या डावाच्या ६२व्या षटकात स्मिथने चौकार लगावत या सामन्यातील दुसरे आणि कारकिर्दीतील २५ वे शतक होते. अ‍ॅशेसच्या एका सामन्यातील दोन्ही डावांत शतक करणारा तो मागील १७ वर्षांतील पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. यानंतर स्मिथने धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान वेडने ७० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

स्मिथला मात्र १४४ धावांवर वोक्सने माघारी पाठवले. त्याने या धावा २०७ चेंडूत केल्या. तसेच त्याने आणि वेडने १२६ धावांची भागी केली. तो बाद झाल्यावर वेडने टीम पेनच्या साथीने अप्रतिम फलंदाजी केली. इंग्लंडचा कर्णधार टाकत असलेल्या षटकात वेडचे चौकार लगावत कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाची आघाडी ३०० धावांच्या पार पोहोचवली.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : २८४ आणि ९५ षटकांत ५ बाद ३९३ (स्मिथ १४२, वेड नाबाद १००, हेड ५१; स्टोक्स २/७५, वोक्स १/४६) वि. इंग्लंड : पहिला डाव ३७४.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -