घरक्रीडा...तर हार्दिक, बुमराहला कसोटी खेळलेच नसते!

…तर हार्दिक, बुमराहला कसोटी खेळलेच नसते!

Subscribe

निवड समिती सदस्यांकडे दूरदृष्टी नसती, तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालीच नसती, असे विधान बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एम.एस.के प्रसाद यांनी केले. बुमराह आणि पांड्या हे दोघे त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला केवळ टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणारे खेळाडू म्हणून ओळखले जायचे. ते कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होण्याबाबत बर्‍याच क्रिकेट समीक्षकांना शंका होती. मात्र, या दोघांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र, असे असतानाही निवड समितीकडे दूरदृष्टी नाही अशी टीका केली जाते.

या टीकेबाबत प्रसाद यांनी सांगितले, आमच्या निवड समितीकडे दूरदृष्टी नसती, तर फक्त मर्यादित षटकांमध्येच चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल गोलंदाज झाला असता का? जर आमच्याकडे दूरदृष्टी नाही, तर फक्त टी-२० क्रिकेटचा खेळाडू म्हणून ओळखला जाणारा हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेटमध्येही इतका यशस्वी झाला कसा? या दोघांना कसोटी संघात निवडण्याचे धाडस केले ही सध्याच्या निवड समितीला गोष्ट लोकांना नेहमी लक्षात राहील.

- Advertisement -

याच समितीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनुभवी फिरकीपटूंना (रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा) वगळून कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या युवकांना संघात स्थान दिले. रिषभ पंत कधीही कसोटी क्रिकेट खेळू शकणार नाही असे म्हटले जायचे, पण याच दूरदृष्टी नसलेल्या समितीने त्याला संधी दिली आणि त्याने या संधीचे सोने केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -