घरक्रीडामोईनचे कौतुक करावे तितके कमी

मोईनचे कौतुक करावे तितके कमी

Subscribe

ईडन गार्डन्स येथे झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपला यंदाच्या आयपीएल मोसमातील केवळ दुसरा विजय मिळवला. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी दिल्यानंतर बंगळुरूची १० षटकांनंतर २ बाद ७० अशी धावसंख्या होती. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि मोईन अलीने फटकेबाजी केल्यामुळे अखेरच्या १० षटकांत बंगळुरूच्या धावसंख्येत १४३ धावांची भर घातली.

सुरुवातीला कोहलीला मोठे फटके मारण्यात अपयश येत होते. मात्र, मोईनने फटकेबाजीला सुरुवात केल्यामुळे कोलकाताचे गोलंदाज दबावात आले आणि याचा फायदा कोहलीलाही मिळाला. तसेच मोईनने कोलकाताच्या डावातील अखेरचे षटक टाकले आणि कोलकाताला गरज असलेल्या २४ धावा करू दिल्या नाहीत. त्यामुळे मोईनचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे कर्णधार कोहली सामन्यानंतर म्हणाला.

- Advertisement -

या सामन्याच्या खेळपट्टीवर मोठे फटके मारणे सोपे नव्हते. पण, मोईनने संपूर्ण खेळच बदलला. त्याने फटकेबाजी केल्यामुळे कोलकाताचे गोलंदाज दबावात आले आणि याचा फायदा मलाही झाला. मोईन फलंदाजीदरम्यान म्हणाला की तो आता फटकेबाजीला सुरुवात करतो आहे. त्याने त्यावेळी फटकेबाजी करणे महत्त्वाचे होते आणि त्यामुळेच या सामन्याचे पारडे आमच्या बाजूने फिरले.

तसेच गोलंदाजीतही त्याने अखेरचे षटक अप्रतिम टाकले. त्याने आणि मार्कस स्टोइनिसने अखेरच्या २ षटकांत खूपच चांगले निर्णय घेतले. अशा दबावाच्या परिस्थितीत घाई करून चालत नाही, त्यावेळी संयमाने खेळ करणे गरजेचे असते आणि त्यांनी तेच केले, असे कोहली म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -