सिंधुदुर्ग : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाय (थाय बॉक्सिंग) असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 28 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुलात थाय बॉक्सिंग या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस मॅडम, क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ, क्रीडा अधिकारी शितल शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाय (थाय बॉक्सिंग) असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष लेफ्टनंट विवेक राणे उपस्थित होते. (Sonam Kalsekar wins first place in district-level school Thai Boxing competition)
स्पर्धेचे उद्घाटन बॅडमिंटन पटू व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते उदय जांभवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना जांभवडेकर म्हणले की, मानवी जीवनात शारीरिक फिटनेसला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे दररोज व्यायाम करणे व आपले शरीर सुदृढ ठेवणे महत्त्वाचे आहे. तरुणांनी व्यायामाकडे वळावे व स्वतःला तंदुरुस्त ठेवावे. जेणेकरून भावी आदर्श पिढी तयार होईल. त्यामुळे खेळाकडे वळा असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेत पंच म्हणून चित्राक्षा मूळये, मृणाल मलये, मारिया आल्मेडा, नितेश गुप्ता, मंगेश गुरव यांनी काम पाहिले.
हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या फलंदाजीवर पार्थिव पटेलचा सवाल; गंभीर आरोप करत म्हणाला…
सदर स्पर्धेमध्ये 36 किलो वजनी गटात संदीप कुमार धर्मेंद्र प्रसाद (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला प्रथम, दुर्वेश चंद्रकांत साटम (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला द्वितीय व समर्थ मल्लिकार्जुन लवटे (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. 40 ते 44 किलो वजनी गटामध्ये जयेश विश्वनाथ राणे (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला प्रथम, मयूर पद्माकर चव्हाण (भ.ता. चव्हाण. म. मा. विदया चौके) याला द्वितीय आणि रंजीत कुमार धर्मेंद्र प्रसाद (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तर 44 ते 48 किलो वजनी गटात विनय राजेंद्र वालावलकर (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तर 48 ते 52 किलो वजनी गटात भरतकुमार सुकाराम प्रजापत (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
17 वर्षाखालील मुलींच्या 32 ते 36 वजनी गटात श्रेया प्रमोद यादव (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) हीला प्रथम, वेदा गणेश खोत (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली)हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तर 36 ते 40 किलो वजनी गटांमध्ये ज्ञानपरी किसन ठोंबरे (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) हिला प्रथम व किमया प्रशांत चव्हाण (भ.ता. चव्हाण. म. मा. विदया चौके )हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तर 40 ते 44 किलो वजनी गटात आर्या अक्षय पाटकर (भ.ता. चव्हाण. म. मा. विदया चौके) हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. 48 ते 52 किलो वजनी गटात रिद्धी संदीप कांबळी (भ.ता. चव्हाण. म. मा. विदया चौके) हिला प्रथम क्रमांक व डिंपल कुमारी सखाराम प्रजापत (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तर 19 वर्षाखालील मुलींच्या 52 ते 60 वजनी गटांमध्ये डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल ओरोसची खेळाडू सोनम तुषार काळसेकर हिचा प्रथम क्रमांक आला.
हेही वाचा – ICC T20I Rankings : चक्रवर्तीने रचला इतिहास, तर तिलक वर्मा या स्थानावर