घरक्रीडाइंग्लंडमध्ये वेस्ट इंडिजसाठी पहिली कसोटी मालिका जिंकणाऱ्या सोनी रामदिन यांचं निधन

इंग्लंडमध्ये वेस्ट इंडिजसाठी पहिली कसोटी मालिका जिंकणाऱ्या सोनी रामदिन यांचं निधन

Subscribe

वेस्ट इंडिजच्या इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटी विजयादरम्यान लॉर्ड्सवरील सामन्यात रामदिनने 152 धावांत 11 विकेट घेतल्या होत्या. वेस्ट इंडिजने 1950 ची ती मालिका 3-1 ने जिंकली होती.

इंग्लंडच्या भूमीवर 1950 मध्ये पहिल्यांदाच मालिका जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील महान फिरकीपटू सोनी रामदिन यांचे निधन झाले. क्रिकेट वेस्ट इंडिजने ही माहिती दिली. रामदिन हे 92 वर्षांचे होते. इंग्लंडविरुद्ध 1950 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे पदार्पण करणाऱ्या रामदिन यांनी 1950 ते 1961 दरम्यान 43 कसोटी सामन्यांमध्ये 28.98 च्या सरासरीने 158 विकेट घेतल्या.

वेस्ट इंडिजच्या इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटी विजयादरम्यान लॉर्ड्सवरील सामन्यात रामदिन यांनी 152 धावांत 11 विकेट घेतल्या होत्या. वेस्ट इंडिजने 1950 ची ती मालिका 3-1 ने जिंकली होती. सीडब्ल्यूआयचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी रविवारी सांगितले की, “क्रिकेट वेस्ट इंडिजच्या वतीने मी वेस्ट इंडिजच्या अव्वल खेळाडूंपैकी एक सोनी रामदिन यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. 1950 च्या दौऱ्यात त्याने एल्फ व्हॅलेंटाईन सोबत एकत्र येऊन क्रिकेटची ‘स्पिन ट्विन’ जोडी बनवली, ज्याने वेस्ट इंडिजला त्यांच्या भूमीवर इंग्लंडला प्रथमच पराभूत करण्यास मदत केली, तेव्हा त्याच्या अद्भुत कामगिरीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात.

- Advertisement -

वेस्ट इंडिज क्रिकेटला सोनी रामदिनची आठवण

सोनी रामदिन यांच्याकडे दोन्ही बाजूंनी चेंडू फिरवण्याची क्षमता होती. ते अॅक्शन न बदलता ऑफ स्पिन आणि लेग ब्रेक दोन्ही गोलंदाजी करू शकत होते. अवघ्या दोन प्रथम श्रेणी सामन्यांच्या अनुभवाच्या जोरावर वयाच्या 21 व्या वर्षी 1950 च्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला संघात घेण्यात आले होते. त्यानंतर मालिकेत त्याने 377.5 षटके टाकली. 1950 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने एल्फ व्हॅलेंटाईनसोबत सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. व्हॅलेंटाईनने चार कसोटीत 33 तर रामदिनने 26 बळी मिळवले. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अॅलेक बेडसरने 11 बळी घेतले. सोनी रामदिन यांनी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तीन वेळा एका डावात पाच विकेट घेण्याचा चमत्कार केला. तसेच एकदा मॅचमध्ये 10 विकेट्स मिळवल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचाः श्रेयस अय्यरने फिफ्टी, फिफ्टी आणि फिफ्टी ठोकल्या, एकट्याने 200 हून अधिक धावा केल्या

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -