सौरव गांगुली BCCI चे अध्यक्षपद सोडण्याची शक्यता; ‘या’ माजी खेळाडूच्या नावाची चर्चा

BCCI च्या कार्यकारिणीसाठी येत्या 18 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. मात्र, यावेळी सौरव गांगुली दुसऱ्यांदा बीसीसीआयच अध्यक्षपद भूषवण्याची शक्यता कमी आहे.

BCCI President Sourav Ganguly admitted to hospital

BCCI च्या कार्यकारिणीसाठी येत्या 18 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. मात्र, यावेळी सौरव गांगुली दुसऱ्यांदा बीसीसीआयच अध्यक्षपद भूषवण्याची शक्यता कमी आहे. कारण सौरव गांगुली यंदाची बीसीसीआय अध्यपदाची निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे. (Sourav Ganguly BCCI Presidency Roger Binny surprise contender next president)

सौरव गांगुली यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, सध्या सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असून, जय शाह सचिव आहेत. त्यामुळे सौरव गांगूली निवडणूक अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याने बीसीसीआय अध्यक्ष कोण होणार याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत गांगुली निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय झाल्याचे एका वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. तसेच या बैठकीला उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खजिनदार अरुण धुमल आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन या बैठकीला हजर होते.

जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत राज्य संघटनांच्या प्रतिनिधिंची यादी आली आहे. यामध्ये काही आश्चर्यकारक नावांचा समावेश आहे. या यादीतील काही व्यक्ती या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यात भारताचे माजी खेळाडू रॉजर बिनी यांचादेखील समावेश आहे.

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने संतोष मेनन यांच्याजागी रॉजर बिन्नी यांचे नाव दिले आहे. हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. रॉजर बिन्नी कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.


हेही वाचा – भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडची फ्लॉप खेळी; नेटकऱ्यांकडून ट्रोल