घरक्रीडाजेव्हा सचिनने गांगुलीला दिली होती करिअर संपवण्याची धमकी

जेव्हा सचिनने गांगुलीला दिली होती करिअर संपवण्याची धमकी

Subscribe

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे. गांगुलीने भारतीय संघाला एका उंच शिखरावर नेलं. गांगुलीने त्याच्या कारकिर्दीत अनेक चांगल्या खेळ्या केल्या, पण त्याची नेतृत्वशैली ही नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र, सौरव गांगुलीला एकदा कारकीर्द संपविण्याची धमकी देण्यात आली होती. १९९७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होता. त्यावेळी सचिनने एकदा सौरव गांगुलीला कारकीर्द संपविण्याची धमकी दिली होती.

सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारताने १९९७ साली वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. या दौर्‍यावर वेस्ट इंडिजविरुद्ध बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताला ३८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या निकालामुळे अखेर भारताने ५ सामन्यांची कसोटी मालिका ०-१ ने गमावली. बार्बाडोस कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला १२० धावांचा पाठलाग करावा लागला. या सामन्यात सचिनला विजयाचा विश्वास होता आणि त्याने एका रेस्टॉरंट मालकाला विजयानंतर पार्टीसाठी शँपेन तयार ठेवण्यास सांगितली, परंतु भारताचा संघ चौथ्या डावात ८१ धावांवर सर्वबाद झाला. हा सामना भारताने ३८ धावांनी गमावला. पराभवानंतर सचिन तेंडुलकर खूप चिडला होता.

- Advertisement -

यानंतर सचिन तेंडुलकरचा राग शांत करण्यासाठी सौरव गांगुली त्याच्या खोलीत गेला. सचिनने दुसर्‍या दिवशी सकाळी धावण्याच्या वेळी गांगुलीला चालण्यास सांगितलं होतं, पण गांगुली गेला नव्हता. सौरव गांगुलीची ही वागणूक सचिनला आवडली नाही आणि गांगुलीला कारकीर्द संपविण्याची धमकी दिली. गांगुलीला घरी पाठवू, त्यामुळे त्याची कारकीर्द संपेल, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -