घरक्रीडासौरव गांगुलीची तुलना इम्रान खानशी, वाचा कोण आहे तो?

सौरव गांगुलीची तुलना इम्रान खानशी, वाचा कोण आहे तो?

Subscribe

भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड होणार हे जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रातून गांगुलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने देखील गांगुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. हे करत असताना तो खेळाडू म्हणाला की, “गांगुलीचे नेतृत्व हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासारखे आहे. गांगुली आणि इम्रान खान हे दोघेही नवीन खेळांडून हेरून त्यांना संधी देण्यात पटाईत आहेत. गांगुली यांनी भारताला अनेक नवे चेहरे दिले. इम्रान खान यांनी देखील पाकिस्तानबाबत हेच केले.” या दोघांची तुलना करणारा दुसरा तिसरा कुणी नसून पाकिस्तानचा प्रसिद्ध गोलंदाज शोएब अख्तर आहे.

सौरव गांगुली यांनी सोमवारी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला. ४७ वर्षीय गांगुली सध्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. २३ ऑक्टोबर रोजी बीसीसीआय अध्यक्षपदाचा निर्णय होईल. अध्यक्ष झाल्यानंतर बीसीसीआयची गाजावाज करण्यापेक्षा प्रथम श्रेणी क्रिकेटला प्राधान्यक्रम देण्याचे मी काम करेल, असे गांगुलीने जाहीर केले आहे.

- Advertisement -

“सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटला कलाटणी दिली. १९९७-९८ च्या आधी भारतीय संघ पाकिस्तानला नमवू शकेल, असे कधी वाटले नव्हते. सौरव गांगुली संघाचा कर्णधार होईपर्यंत मला कधीही वाटले नव्हते की भारत पाकिस्तानचा पराभव करु शकेल. गांगुलीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकला”, अशी प्रतिक्रिया ४४ वर्षीय अख्तरने दिली आहे.

- Advertisement -

अख्तर पुढे म्हणाला की, गांगुली हा इम्रान खान यांच्यासारखा आहे. इम्रान खान हे पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून देणारे एकमेव कर्णधार आहेत. सौरव गांगुली देखील २००३ मध्ये वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचला होता, मात्र रिकी पॉन्टींगच्या ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सौरव गांगुली यांनी २००८ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. १९९६ साली क्रिकेटमध्ये आल्यानंतर २००० ते २००५ या काळात त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. सध्या ते बंगाल क्रिकेट असोशिएनचे अध्यक्ष आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -