घरक्रीडाबीसीसीआय अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरुन सौरव गांगुलीचा खुलासा, म्हणाला...

बीसीसीआय अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरुन सौरव गांगुलीचा खुलासा, म्हणाला…

Subscribe

गांगुली यांनी केलेल्या एका ट्टिटमुळे त्यांच्या राजीनामा दिल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, गांगुली यांनी राजीनामा दिला नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची मोठी चर्चा सुरु झाली होती. यानंतर गांगुली यांनी राजीनामा दिला नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले. यावर सौरव गांगुली यांनी यावर ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे.

सौरव गांगुली यांनी यांनी ट्विट करत नव्या कारकिर्दीचे संकेत दिले आहेत. गांगुली यांनी ट्विटमध्ये म्हटले की, १९९२ पासून सुरू केलेल्या किक्रेटच्या कारकिर्दीला २०२२ मध्ये ३० वर्ष पूर्ण होत आहेत. क्रिकेटने मला खूप काही दिले. माझ्या या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. आज मी नवीन काही सुरूवात करत आहे ज्याचा खूप लोकांना लाभ होईल. मला आशा की तुमची साथ मला कायम राहील.

- Advertisement -

— ANI (@ANI) June 1, 2022

 

- Advertisement -

गांगुली म्हणाले की, ‘बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. मी नवीन एज्युकेशन अॅप लाँच करणार आहे. ‘  BCCI मधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सौरव गांगुली शिक्षण क्षेत्रात नवीन कंपनी लाँच करणार आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये सौरव गांगुली यांचा बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपणार आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ सांभाळला होता. त्याआधी सौरव गांगुली यांनी बंगाल क्रिकेट संघाचे चीफ म्हणून काम पाहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -