घरक्रीडावृद्धिमान साहा भारतातील सर्वोत्तम यष्टीरक्षक - सौरव गांगुली

वृद्धिमान साहा भारतातील सर्वोत्तम यष्टीरक्षक – सौरव गांगुली

Subscribe

भारताचा कर्णधार सौरव गांगुलीच्या मते धोनी किंवा पंत नाही तर साहा हाच भारतातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे.

भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा सध्या खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर साहा हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा प्रमुख यष्टीरक्षक म्हणून समोर आला. पण दुखापतीमुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले आहे. या काळात युवा रिषभ पंतने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली आहे. त्याने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगले प्रदर्शन केले. मात्र असे असले तरी भारताचा कर्णधार सौरव गांगुलीच्या मते साहा हाच भारतातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे.

तो जितक्या लवकर बरा होईल तितके चांगले

साहाविषयी गांगुली म्हणाला, “साहा आता दुखापतीमुळे जवळपास वर्षभर भारतीय संघाबाहेर आहे. असे असले तरी माझ्यामते तो मागील ५-१० वर्षांतील भारताचा सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. मला आशा आहे की तो दुखापतीतून लवकर सावरेल. दुखापत कोणालाही कधीही होऊ शकते. यष्टिरक्षकाला चेंडू पकडण्यासाठी बऱ्याचदा उड्या माराव्या लागतात. त्याला उडी मारतानाच ही दुखापत झाली. दुखापतीतून सावरण्यासाठी ठराविक कालावधी लागतो. पण तो जितक्या लवकर बरा होईल तितके त्याच्यासाठी चांगले.”

डिसेंबरमध्ये रणजी ट्रॉफीतून पुनरागमन करणार  

वृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये बंगालकडून रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार आहे. याबद्दल माहिती देताना साहा म्हणाला, ” आता मला बरे वाटते आहे. मी डिसेंबरच्या मध्यात पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला सुरुवात करेन. त्यानुसार मी सरावही सुरु केला आहे. मला आशा आहे की मी डिसेंबरमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये खेळीन.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -