Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा सौरव गांगुलीला ‘Z’ दर्जाची सुरक्षा, पश्चिम बंगालच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची माहिती

सौरव गांगुलीला ‘Z’ दर्जाची सुरक्षा, पश्चिम बंगालच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची माहिती

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांवर आठ ते दहा पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. गांगुली यांना प्रदान करण्यात आलेल्या ‘Y’ श्रेणीच्या सुरक्षेचा कार्यकाळ संपल्यानंतर काल (मंगळवार) हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांना ‘Z’ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. याबाबत पश्चिम बंगालच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

पश्चिम बंगाल सरकारच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, व्हीव्हीआयपी सुरक्षा संपल्यानंतर प्रोटोकॉलनुसार आढावा घेण्यात आला. त्यानंतर गांगुली यांची सुरक्षा बदलून झेड श्रेणीत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्य सचिवालयाचे प्रतिनिधी गांगुली यांच्या बेहाला या कार्यालयात पोहोचले, जिथे त्यांनी कोलकाता पोलीस मुख्यालय लालबाजार आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गांगुली सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे क्रिकेट संचालकपद सांभाळत आहे. सौरव गांगुली यांनी राज्य किंवा केंद्र सरकारकडे कोणतीही विनंती केली नव्हती. परंतु पश्चिम बंगाल सरकारच्या प्रशासकीय कार्यालयाने ती मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल सीव्ही आनंद बोस, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रीय सचिव अभिषेक बॅनर्जी यांना झेड प्लस सुरक्षा मिळते. तर फिरहाद हकीम आणि मोलॉय घटक या मंत्र्यांना ‘Z’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.


हेही वाचा : प्रेमकथेचे रुपांतर लग्नात झाले; शुभमन गिलच्या फलंदाजीवर सेहवागचे विधान व्हायरल


 

- Advertisment -