घरक्रीडाSourav Ganguly: सौरव गांगुलीचा लाखो रुपयांचा मोबाइल चोरीला; फोनमध्ये वैयक्तिक माहिती असल्यानं...

Sourav Ganguly: सौरव गांगुलीचा लाखो रुपयांचा मोबाइल चोरीला; फोनमध्ये वैयक्तिक माहिती असल्यानं दादा चिंतेत

Subscribe

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांचा मोबाईल फोन चोरीला गेला आहे. याबाबत ‘दादा’ यांनी ठाकूरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांचा मोबाईल फोन चोरीला गेला आहे. याबाबत ‘दादा’ यांनी ठाकूरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गांगुलीचा हरवलेला मोबाईल फोन 1 लाख 60 हजारांचा आहे, जो कोलकातामधील बेहाला येथील त्याच्या घरातून चोरीला गेला होता, असे अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक गांगुली हरवलेल्या फोनमुळे खूप चिंतेत आहेत. त्या मोबाईलमध्ये गांगुलीची बरीच वैयक्तिक माहिती आहे. (Sourav Ganguly Sourav Ganguly s mobile worth lakhs of rupees stolen Dada is worried because there is personal information in the phone)

‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ अशी ओळख असणाऱ्या सौरव गांगुलीने पोलिसांना तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीने त्याच्या तक्रारीत म्हटलंय, ‘मला वाटत आहे की माझा फोन घरातून चोरीला गेला आहे. मी शेवटचा फोन 19 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता हाताळला होता. त्यानंतर मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सापडला नाही. मला माझा फोन हरवल्याची काळजी वाटते. कारण अनेक संपर्क क्रमांकांव्यतिरिक्त, त्यात माझ्या खात्याशी संबंधित वैयक्तिक माहिती आहे.

- Advertisement -

गांगुलीच्या घरी पेंटिंगचे काम सुरूय

सौरव गांगुलीच्या घरात पेंटिंगचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत अनेक नोकरदार लोक घरी येत-जातात. गांगुलीने सांगितले की, अनेक बँक खाती मोबाईलशीही जोडलेली आहेत. अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे नंबरही सेव्ह केले आहेत. गांगुली म्हणाला, ‘मी पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याची विनंती करतो.’

19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या आयोजनावर तो म्हणाले…

- Advertisement -

सौरव गांगुली हा दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचा क्रिकेट संचालक आहे. 2003 च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत टीम इंडियाला आपल्या नेतृत्वाखाली घेऊन गेलेल्या सौरव गांगुलीचे असे मत आहे की अंडर-19 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे हा तोट्याचा करार आहे. वरिष्ठ संघ वगळता इतर कोणत्याही स्पर्धेत फारसा फायदा होत नाही.

(हेही वाचा: UBT Convention: एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपाचे ‘कॉन्ट्रॅक्ट लेबर’; राऊत पुन्हा बरळले )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -