घरक्रीडासौरव गांगुलीच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव

सौरव गांगुलीच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव

Subscribe

सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून कोरोना विषाणूचा संसर्ग केवळ सामान्य नागरिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या परिवारातील सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुलीची पत्नी आणि तिच्या आई – बाबांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने दिली आहे. स्नेहाशिष गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये सचिव या पदावर कार्यरत आहे.

अशी झाली लागण

स्नेहाशिष यांच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर घरातील सर्व लोकांची चाचणी केली असता, स्नेहाशिष याची पत्नी आणि सासु-सासऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर स्नेहाशिष याचा अहवाल मात्र, निगेटीव्ह आला आहे. या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आरोग्यसाधना.. क्रीडाकतर्फे रविवारी ऑनलाईन योगसत्र


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -