IND vs SA: विराट कोहलीच्या चुकीमुळे टीम इंडियाचा पराभव, आफ्रिकन कर्णधाराचा मोठा खुलासा

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने टीम इंडियाच्या पराभवाबाबत मोठा खुलासा केला आहे. डीआरएस वादामुळे त्यांना टीम इंडियाविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत आव्हान पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला. या वादामुळे विराट सेनेचं लक्ष भरकटलं होतं. एल्गरला आऊट देण्याचा निर्णय तिसऱ्या अंपायरने बदलला. कारण डीआरएसमध्ये बॉल स्टंपवरून जाताना दिसतो. त्यामुळे टीम इंडियाच्या संघाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि फिरकीपटू आर. अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या प्रसारक सुपर स्पोर्ट्सच्या स्पंम्प माईकवर जाऊन खडेबोल सुनावले.

दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी २१२ धावांचं आव्हान टीम इंडियाने दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने एका विकेटवर ६० धावा पूर्ण केल्या होत्या. यावेळी डीआरसच्या वादामुळे आपला थोडा वेळ मिळाला आणि त्यानंतर आमच्या धावांची गती वाढली. या आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मोठी मदत मिळाली. डीआरएसच्या निर्णयानंतर कोहली आणि संपूर्ण टीमने नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यांचं लक्ष खेळाकडून विचलीत झालं. परंतु मला खूप मजा आली. कारण त्यांच्यावरचा दबाव वाढला होता, असं डीएन एल्गर म्हणाला.

आम्ही खूप आनंदी होतो कारण तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आम्हाला चांगली फलंदाजी करायची होती. कारण खेळपट्टीवरून गोलंदाजांना मोठी मदत मिळाली. घरातील किंवा मायदेशामध्ये सुरू असलेला पहिला सामना गमावल्यामुळे आदर्श निर्माण होत नाही. मात्र, पहिली कसोटी गमावल्यानंतर आम्ही खडबडून जागे झालो आणि आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी केली आणि उर्वरित सामने जिंकलो,असं एल्गरने म्हटलंय.


हेही वाचा : बँका चालवणं स्पर्धात्मक, पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया