PSL 2022 : पाकिस्तान क्रिकेटच्या अडचणीत वाढ, दक्षिण आफ्रिका बोर्डाने दिला मोठा झटका

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेटला मोठा झटका दिला आहे. त्यांनी पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2022 हंगामात त्यांच्या करारबद्ध खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिलेली नाहीये. सीएसएने सांगितलं की, आफ्रिका खेळाडूंना सर्वात पहिलं आंतरराष्ट्रीय आणि देशातील टूर्नामेंटवर लक्ष देण्यास सांगितलं आहे. त्यानंतरच बाहेरील सामने खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच हा निर्णय योग्य असल्याचं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर ग्रीम स्मिथ यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान सुपर लीगसाठी प्रोटीज खेळाडूंना एनओसी देण्यात आलेली नाहीये. आंतरराष्ट्रीय आणि देशात खेळवली जाणारी मालिका हे त्याचं कारण आहे.

देशासाठी खेळणंच खेळाडूंचं पहिलं कर्तव्य

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंचा आता न्यूझिलंड दौरा आहे. त्यानंतर बांगलादेशसोबत मालिका खेळवण्यात येणार आहे. आमच्या करारबद्ध खेळाडूंसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय टीमसोबत असणे. हे त्यांचे पहिले कर्तव्य आहे. देशांतर्गत स्पर्धांसाठीही हाच नियम आहे.

शेड्यूल पाहिल्यानंतरच खेळाडूंना मंजूरी

स्मिथने सांगितलं की, जर खेळाडूंना टी-२० टूर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी मिळत असेल आणि त्याचं शेड्यूल जर आंतराराष्ट्रीय किंवा देशांतर्गत होणाऱ्या सामन्यांपासून वेगळं असेल तर त्यांना सहमती दिली जाणार आहे. याआधी सुद्धा आम्ही असं केलंय. आम्ही कोणत्याही खेळाडूला डावललं किंवा नाकारलं नाहीये.

कधी सुरू होणार पाकिस्तान सुपर लीग?

२७ जानेवारीपासून पाकिस्तान सुपर लीगला सुरूवात होणार आहे. परंतु सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंचा मसुदा तयार केला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचा या तिन्ही खेळाडूंवर परिणाम होणार नाहीये, असं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : IPL Auction 2022: फेब्रुवारीमध्ये बंगळूरुत होणार आयपीएल मेगा ऑक्शनचे आयोजन?, जाणून घ्या अपडेट