घरक्रीडादक्षिण आफ्रिकेच्या हाशिमने हिंदूंना मुस्लीम बनवलं, माजी पाक क्रिकेटपटूचा मोठा दावा

दक्षिण आफ्रिकेच्या हाशिमने हिंदूंना मुस्लीम बनवलं, माजी पाक क्रिकेटपटूचा मोठा दावा

Subscribe

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अन्वरने दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम अमलाबाबत मोठा दावा केला आहे. हाशिम अमलाने हिंदूंना मुस्लीम बनवलं, असा दावा सईद अन्वरने केला आहे. अन्वरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अन्वर अमलाच्या खेळाचे कौतुक करताना दिसत आहे. परंतु त्याने केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे.

विश्वचषकात अनेक लोक इस्लाम धर्म स्वीकारत आहेत. अल्लाहने विश्वचषक हे माध्यम बनवले आहे. तसेच अमला हा महान क्रिकेटपटू आहे. त्याने अनेकांना कलमा शिकवला आहे. एक हिंदू कुटुंब पूर्णपणे मुस्लीम झाले. मोहम्मद युसूफ देखील अनेक लोकांसाठी माध्यम झाला. अन्वरच्या या विधानावर सध्या तो खूप ट्रोल होत आहे. प्रत्येक पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू मुस्लिमेतर समाजातील काहींना धर्मांतर करून मुस्लीम करण्याचा प्रयत्नात होता, असा दावा ट्विटमध्ये करण्यात आला होता.

- Advertisement -

1927 मध्ये हाशिम अमलाचे आजोबा सुरतहून दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते. अमलाने 2004 ते 2019 दरम्यान 124 कसोटी, 181 एकदिवसीय आणि 44 टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर 9 हजार 282 कसोटी धावा, 8113 एकदिवसीय धावा आणि 1277 टी-20 धावा आहेत. वनडे क्रिकेटमध्ये अमलाने 10 शतकं झळकावली आहेत. जून 2014 आणि जानेवारी 2016 च्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट टीमचं त्याने नेतृत्वही केलं आहे. 2017 मध्ये अमला किंग्ज इलेव्हन पंजाब या संघातून खेळत होते. यावेळी त्याने 2 शतक झळकावले होते. मात्र, 8 ऑगस्ट 2019 रोजी, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

- Advertisement -

हेही वाचा : पर्यटन, कौशल्य विकास विभागात एक लाख रोजगार निर्मिती – मंगलप्रभात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -