Sean Whitehead: साऊथ अफ्रिकेच्या स्पिनर गोलंदाजाचा अनोखा विक्रम, १२ षटकांमध्ये संपूर्ण संघालाच केलं ऑल आऊट

south Africa spinner Sean Whitehead claim 10 wickets in two innings in 12 over
Sean Whitehead: साऊथ अफ्रिकेच्या स्पिनर गोलंदाजाचा अनोखा विक्रम, १२ षटकांमध्ये संपूर्ण संघालाच केलं ऑल आऊट

दक्षिण अफ्रिकेत देशांतर्गत खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यात खेळाडूनं अनोखा विक्रम रचला आहे. स्पिनर शॉन वाइटहेड याने ४ दिवसीय सामन्यात एकाच डावात हा विक्रम केला आहे. साउथ वेस्टर्न डिस्ट्रिक्टकडून खेळताना डावखुरा स्पिनर गोलंदाज शॉन याने ३६ धावा देत १० विकेट घेतले आहेत. केवळ १२ षटकांमध्ये शॉनने संघाला फक्त ६५ धावांमध्येच प्रतिस्पर्धी संघाला ऑलआउट केले.

शॉन वाइटहेडने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर २ खेळाडूंना बाद केले आहे. तर ३ खेळाडूंना एल्बीडब्ल्यू आणि ५ खेळाडू झेलबाद होऊन तंबूत परतले. दक्षिण अफ्रिकेतील देशांतर्गत क्रिकेच्या इतिहासात असा विक्रम कोणीही करु शकले नाही. मात्र दुसऱ्या डावातील हे दुसरे सर्वाधिक उत्तम प्रदर्शन आहे. शॉनला या सामन्यात एकूण १५ विकेट मिळाले आहेत. त्याने ६५ धावा देत ५ गडी बाद केले. दोन्ही डावात ६६,आणि ४५ धावा काढल्या देखील आहेत. यामुळे शॉनचा रेकॉर्ड अधिक चांगला झाला आहे. ११ प्रथम श्रेणीच्या सामन्यात त्याच्या नावे ३९ धावा आहेत.

दरम्यान यापुर्वी १९०६ मध्ये लेग स्पिनर बर्ट वॉगलरने केवळ २६ धावा देऊन १० गडी बाद केले होते. परंतु त्यांनी ते ईस्टर्न अफ्रिकेसाठी केले होते. तर आता शॉन वाइटहेडने साउथ अफ्रिकेसाठी खेळी केली आहे. या सामन्याची माहिती ट्विटवर देण्यात आली आहे. जर प्रथम श्रेणीतील क्रिकेटमध्ये जर कोणी एका डावात असा विक्रम १९३२ मध्ये करण्यात आला होता. यॉर्करशायरचा के एच. वैरिटीने फक्त १० धावा देऊन एका डावात १० विकेट घेतले होते.


हेही वाचा : रोहित शर्मा मोठा कर्णधार होण्यामागे ॲडम गिलक्रिस्टचा हात, प्रज्ञान ओझाचा दावा