T20 world cup 2021 : WI vs SA दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखून सामन्यावर गाजवले वर्चस्व

रासी वैन डर डुसेन आमि रीजा हेंड्रीक्स या दोघांच्या सावध खेळीमुळे आफ्रिकेने सामन्यावर सहज विजय मिळवला

वेस्टइडींज विरूध्द दक्षिण आफ्रिकेचा सामना चांगलाच चुरशीचा झाला, टी २० विश्वचषकात वेस्टइंडीजचा सलग दुसरा पराभव झाला, नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्टइंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. या सोबतच माजी वर्ल्ड चॅम्पियन वेस्टइंडिजचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग खडतर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा २०२१ विश्वचषकातील हा पहिला विजय आहे, या सामन्यात वेस्टइंडिजने प्रथम फलंदाजी करत १४३ धावा बनवल्या. इविन लुईस ने ५६ धावांची अर्धशतकीय खेळी केली. ख्रिस गेल पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी झाला.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ८ बाद १४३ धावा केल्या. इविन लुइसच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने प्रतिस्पर्धी संघाला १४४ धावांचे आव्हान दिले, एडेन मार्करमच्या आक्रमक अर्धशतकीय खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सामन्यावर सुरूवातीपासूनच पकड ठेवली होती. रासी वैन डर डुसेन आमि रीजा हेंड्रीक्स या दोघांच्या सावध खेळीमुळे आफ्रिकेने सामन्यावर सहज विजय मिळवला, दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेनने ३ आणि केशव महाराजने २ बळी घेतले, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही प्रभावी पहायला मिळाली.

दक्षिण आफ्रिकेच्या संघात रीजा हेंड्रीक्सला क्विंटन डिकॉकच्या जागेवर जागा मिळाली आहे. डिकॉक दुखापत ग्रस्त असल्याने त्याने खेळण्यासाठी नकार दिला आहे. तर वेस्टइंडिजने ओबेद मैकॉयच्या जागेवर हेडन वॉल्श ज्युनियर या खेळाडूचा पहिल्या ११ खेळाडूंमध्ये समावेश केला आहे.

वेस्टइंडिजचा आजचा संघ

लेंडल सिमंस, एविन लुईस, ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, ( कर्णधार ) आंद्रे रसेल, ड्वेन ब्रावो, अकील हुसैन, हेडन वॉल्श ज्युनियर, रवी रामपॉल,

दक्षिण आफ्रिकेचा आजचा संघ

टेम्बा बावुमा ( कर्णधार ), रीजा हेंड्रीक्स, रासी वैन डर डूसेन, ए़डेन मार्करम, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, ड्वेन प्रीटोरियस, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नोर्तजो, तबरेज शम्सी