घरक्रीडाNations League : स्पेनची जर्मनीवर मात; फ्रांस, पोर्तुगालचे विजय

Nations League : स्पेनची जर्मनीवर मात; फ्रांस, पोर्तुगालचे विजय

Subscribe

जर्मनीचे नेशन्स लीग स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

फेरान टोरेसच्या हॅटट्रिकच्या जोरावर स्पेनने युएफा नेशन्स लीगच्या सामन्यात जर्मनीचा ६-० असा धुव्वा उडवला. अल्वारो मोराटा, फेरान टोरेस आणि रॉड्री यांच्या गोलमुळे मध्यंतराला स्पेनकडे ३-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात आणखी दोन करत टोरेसने हॅटट्रिक पूर्ण केली, तर स्पेनचा सहावा गोल मिकेल ओयारझबालने केला. या पराभवामुळे जर्मनीचे नेशन्स लीग स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ‘स्पेनच्या पहिल्या गोलनंतर आमचा खेळ खूपच खालावला. आम्ही आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण याचा फायदा स्पेनला झाला. आम्ही नक्की काय योजना आखली होती हे आमचे खेळाडू विसरलेच,’ अशा शब्दांत जर्मनीचे प्रशिक्षक योकीम लोव्ह यांनी खेळाडूंवर टीका केली.

विश्वविजेते फ्रांस, तसेच पोर्तुगाल या संघांना नेशन्स लीगमधील आपापले सामने जिंकण्यात यश आले. फ्रांसने स्वीडनवर ४-२ अशी मात केली. फ्रांसकडून स्ट्रायकर ऑलिव्हिएर जिरुडने दोन, तर बेंजामिन पावर्ड आणि किंग्सले कोमान यांनी एक-एक गोल केला. फ्रांसचा हा सहा सामन्यांत पाचवा विजय ठरला. त्यामुळे ‘लीग ए गट ३’मध्ये फ्रांसने अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे पोर्तुगालने क्रोएशियाचा ३-२ असा पराभव केला. पोर्तुगालचे गोल रूबेन डियाझ (२) आणि जाओ फेलिक्स यांनी केले. क्रोएशियाचे दोन्ही गोल माटेयो कोवाचिचने केले. मॉन्टेनेग्रोने सायप्रसवर ४-० अशी मात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -