स्पेनचा भारतावर विजय; विश्वचषकातून भारतीय महिला हॉकी संघ बाहेर

स्पेन आणि भारत यांच्यात झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. स्पेनकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाचे 'महिला हॉकी विश्वचषक 2022' मधील आव्हान संपुष्टात आले आहे.

स्पेन आणि भारत यांच्यात झालेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. स्पेनकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाचे ‘महिला हॉकी विश्वचषक 2022’ मधील आव्हान संपुष्टात आले आहे. या सामन्याच्या अखेरच्या तीन मिनिटात स्पेनने गोल करत या विश्वचषकात विजय मिळवला. विशेष म्हणजे या स्पर्धेतील भारताचे सुरुवातीचे दोन्ही सामने अनिर्णित ठरले. त्यानंतर अखेरच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. (Spain women hockey team won against India women hockey team in women hockey world cup 2022)

या विश्वचषकातील स्पेनविरुद्ध खेळताना भारताने सुरूवातीला चांगली कामगिरी केली. क्रॉस ओव्हर सामन्यात भारतीय महिला संघाने सुरुवातीला दमदार खेळी केली. दोन्ही संघांमध्ये तीन क्वार्टरपर्यंत बरोबरीची स्पर्धा पाहायला मिळाली. मात्र, चौथ्या कार्टरमध्ये आक्रमकता दाखवत स्पेननं आपली भूमिका स्पष्ट केली.

याचाच फायदा घेत स्पेनने भारताविरुद्ध सातत्याने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्पेनचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. परंतु, या सामन्याच्या अखेरच्या तीन मिनिटात स्पेनने गोल करत भारताचा १-० असा पराभव केला. भारताला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आलेला नाही. पूली बी सामन्यात इंग्लंड आणि चीननं भारतासोबत १-१ अशी बरोबरी साधली. तर, न्यूझीलंडविरुद्ध ४-३ आणि स्पेनविरुद्ध १-० ने भारताला स्वीकारावा लागला.

भारतीय संघ आता विश्वचषकात ९ व्या ते १६ व्या स्थानासाठी इतर संघांशी भिडणार आहे. सोमवारी त्याचा सामना कॅनडाशी होणार आहे. तीनही सामने गमावून कॅनडा पूल-सीमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.


हेही वाचा – क्रिकेटरपासून अंपायरपर्यंत सगळंच बोगस, गुजरातमध्ये IPLचे फेक नेटवर्क