IND vs AUS T-20 Final : प्रेक्षकांमधल्या एकाला करोनाची लागण

८ मार्चला ऑस्ट्रेलियात मेलबर्न स्टेडिअमवर भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया हा महिला टी-२० वर्ल्डकपचा अखेरचा सामना पार पडला. या सामन्याला ऑस्ट्रेलियातील क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. हा सामना बघायला करोनाबाधीत संशयीत रूग्णाने हजेरी लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकतीच ही माहिती मेलबर्न क्रिकेट ग्राउंड व्यवस्थापनेला मिळाली आहे.

आरोग्य आणि मानव सेवा विभागाने संरक्षक निदानाचा सल्ला दिला आहे. ही मॅच बघायला आलेला करोनाबाधीत संशयीत रूग्ण उत्तरकडील स्टॅण्डमध्ये लेवल २ मध्ये बसला होता. N 42 या आसनक्रमांकावर हा करोनाबाधीत रूग्ण बसला होता. त्यामुळे सध्या त्याच्या आजूबाजूला बसलेल्यांचा शोध सुरू आहे.

भारत–ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न स्टेडियमवर रंगलेल्या महिला टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वविजेते पदावर आपले नाव कोरले आहे. तर भारतीय संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. भारताला विश्वविजेते होण्याची संधी होती. मात्र जागतिक महिला दिनी झालेल्या अंतिम सामन्यात भारताचे स्वनं भंगले आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकात १८४ धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारताने १९.१ षटकात सर्व विकेट्स गमावून ९९ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने ८५ धावांनी हा सामना जिंकला.


हे ही वाचा- ‘करोना’ बाधीतांची नावे फोडणाऱ्यांवर होणार कारवाई