घरक्रीडाफिरकीनिर्भर भारत!

फिरकीनिर्भर भारत!

Subscribe

अहमदाबाद येथील सरदार पटेल क्रीडा संकुलातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना पार पडला. हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील सव्वाशेवा (१२५ वा) कसोटी सामना ठरला. या दिवस-रात्र कसोटीत भारताने दहा विकेट राखून विजय संपादला. अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत बोलायचे, तर सामना दुसऱ्या दिवशीच संपेल असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र, दुसऱ्या दिवशी खेळपट्टीवर चेंडू उसळू लागले, खेळपट्टी आणि क्रीजवरील माती उखडू लागली. आशियाई खेळपट्ट्या या फिरकीला धार्जिण्या असतात, असा आरोप इंग्लंड गेली अनेक वर्षे करत असून त्यांची भारतात डाळ शिजत नाही हे सर्वश्रुत आहे.

विराट कोहलीची टीम इंडिया जोशात खेळत असून पहिली कसोटी गमावल्यानंतर निराश न होता, कोहली आणि त्याच्या साथीदारांनी जिगरबाज खेळ करून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. तिसरी कसोटी अहमदाबादच्या नव्या स्टेडियमध्ये झाली आणि या स्टेडियमबाबत बरीच चर्चा होत आहे. स्टेडियमचे नाव बदलण्यापासून कसोटी सामना २ दिवसातच आटोपल्यामुळे खेळपट्टीबाबतही उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. यजमान संघ बहुदा आपल्याला अनूकुल अशाच खेळपट्टी बनवतो असे म्हटले जाते आणि त्यात तथ्य आहेच. आशियाई खेळपट्ट्या या फिरकीला धार्जिण्या असतात, असा आरोप इंग्लंड गेली अनेक वर्षे करत असून त्यांची भारतात डाळ शिजत नाही हे सर्वश्रुत आहे. मात्र, परदेशी संघांपैकी इंग्लंडनेच भारतात तीनदा मालिका जिंकल्या आहेत (१९७६-७७, १९८४ आणि २०११-१२) हे सुद्धा विसरून चालणार नाही.

अहमदाबादची खेळपट्टी कसोटी सामन्याला लायक नव्हती, असे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यात केवळ इंग्लंडचेच खेळाडू, माजी कसोटीपटू आहेत असे नव्हे. नव्या स्टेडियमवरील कसोटी सामना अन् जेमतेम दोन दिवसातच खेळ खल्लास व्हावा, ही काही कसोटी क्रिकेटला पोषक बाब नाही. इंग्लंडची फलंदाजी इतकी ठिसूळ झाली आहे की गेल्या दोन कसोटीच्या चार डावातील त्यांच्या धावाच सारे काही सांगतात. अहमदाबादच्या तिसऱ्या कसोटीत ११२ आणि ८१ धावा, तर त्याआधी चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीत १३४ आणि १६४ धावा! म्हणजेच चार डावात मिळून पाहुण्यांना एकूण ४९१ धावाच करता आल्या. याच इंग्लंडने चेन्नईला झालेल्या सलमीच्या कसोटीत ५७८ धावांचा डोंगर उभारला तो टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करून!

- Advertisement -

अहमदाबाद येथील सरदार पटेल क्रीडा संकुलातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना पार पडला. हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील सव्वाशेवा (१२५ वा) कसोटी सामना ठरला. या सामन्यात भारताने दहा विकेट राखून विजय संपादला. दिवस-रात्र कसोटीतील अ‍ॅडलेड कसोटीची आठवण भारताला विसरण्याजोगीच. परंतु, भारतात झालेल्या दोन्ही दिवस-रात्र कसोटीत यजमान भारतानेच बाजी मारली आहे. १५ महिन्यांपूर्वी झालेल्या ईडन गार्डन्सवरील कसोटीत बांगलादेशवर तीन दिवसातच भारताने ९ विकेटनी विजय मिळवला होता. त्या विजयाचा शिल्पकार होता सामन्यात ९ मोहरे टिपणारा ईशांत शर्मा.

अहमदाबाद कसोटीत मात्र त्याच्या वाट्याला जेमतेम ५ षटके आली आणि त्यानेच सलामीवीर सिबलीला स्लिपमधील रोहित शर्माकरवी झेलबाद करून इंग्लंडचा पहिला झटका दिला. दुसऱ्या डावात मात्र कर्णधार विराटने ईशांत आणि बुमराहकडे न वळता सरळ अक्षर पटेल आणि रवी अश्विन या फिरकी गोलंदाजांना नवा गुलाबी चेंडू सोपवला. एसजी (SG) बनावटीचे हे गुलाबी चेंडू खासच म्हणावे लागतील. याचे कारण त्यावर वरती वर्ख असल्यामुळे हा चेंडू लाल, तसेच सफेद चेंडूच्या तुलनेत झपकन आणि वेगात येतो. फलंदाजाला त्याचा अंदाज येत नाही अन् ते आपसुक फसतात. त्यातच फूटवर्कच्या अभावामुळे ते पायचीत होतात.

- Advertisement -

नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत बोलायचे, तर सामना दुसऱ्या दिवशीच संपेल असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र, दुसऱ्या दिवशी खेळपट्टीवर चेंडू उसळू लागले, खेळपट्टी आणि क्रीजवरील माती उखडू लागली. त्यामुळे जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडला (खरतर या तेज जोडगोळीला एकत्र खेळवण्याचा इंग्लंडचा निर्णय चुकलाच) गोलंदाजी देणे इंग्लंडचा कर्णधार रूटला अवघड होऊन बसले. मग त्याने स्वतःच गोलंदाजी केली अन् ८ धावातच भारताचा निम्मा संघदेखील गारद केला.

हा सामना भारताचा अनुभवी ऑफस्पिनर अश्विनसाठी खास ठरला. त्याने आर्चरला बाद करून कसोटी क्रिकेटमधील ४०० विकेटचा टप्पा पूर्ण केला, तोदेखील ७७ कसोटीत! या कसोटीत ७० धावांत ११ बळी मिळवणारा अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. कसोटी पदार्पणात त्याने चेपॉकच्या दुसऱ्या कसोटीत सात विकेट घेतल्या आणि घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना आपल्या दुसऱ्याच कसोटीत त्याने सामनावीराचा किताब पटकावला.

अहमदाबादच्या या भव्य दिव्य स्टेडियमची १ लाख १० हजार इतकी आसन क्षमता आहे, असे म्हणतात. परंतु, या पहिल्या कसोटीसाठी पहिल्या दिवशी २८ हजार, तर दुसऱ्या दिवशी १८ हजार इतकी तिकीट विक्री झाल्याची माहिती मिळाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारत आता प्रबळ दावेदार आहे. लॉर्ड्सवर होणारा हा अंतिम सामना १८ ते २२ जून २०२१ या कालावधीत खेळला जाणार असे आयसीसीने जाहीर केले असून न्यूझीलंडचा संघ आधीच अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आता भारतीय संघ ४ मार्चपासून खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्ध अखेरच्या कसोटीत कसा खेळतो आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठतो का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -