फायनलमध्ये पोहचून भारतीय तिरंदाजांनी पक्की केली पदक

भारताने आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपच्या पुरुष, महिला आणि मिश्र सांघिक स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

भारताने आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपच्या पुरुष, महिला आणि मिश्र सांघिक स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासह या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील त्यांची तीन पदके निश्चित झाली आहेत. कंपाऊंड पुरुष, महिला आणि रिकर्व्ह मिश्र सांघिक स्पर्धांमध्येही उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर भारत कांस्यपदकासाठी खेळणार आहे. जवळपास सर्वच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला चांगली टक्कर देणारा कट्टर प्रतिस्पर्धी कोरिया तिन्ही फायनलमध्ये पुन्हा भारत आणि सुवर्णपदकांदरम्यान उभा आहे. भारताकडून व्यक्तिगत कंपाउंडमध्ये २ पदकांची आशा केली जात आहे. यामधील १ पदक निश्चित झाले आहे.

अंकिता भगत, मधु वेदवान आणि रिध्दीच्या महिला संघाने वियतनामला ६-० अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. कपिल, प्रवीण जाधव आणि पार्थ साळुंखे यांच्या पुरुषांच्या रिकर्व्ह संघाला उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित बांगलादेशने कडवी झुंज दिली. स्थानिय त्रिकुटाने ३-१ अशी आघाडी घेतली पण भारतीय त्रिकुटाने स्कोर ४-४ असा करून सामना टायब्रेकपर्यंत खेचून आणला.

शूट ऑफही बरोबरीत सुटला आणि त्यानंतर बदल्यात भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्हीही संघाने १०,९ आणि ८ असे गुण मिळवले. पण भारताचा १० अंकाचा तिर केंद्रापासून अधिक जवळ असल्याकारणाने भारताला विजयी घोषित करण्यात आले. ऋषभ यादव आणि ज्योती सुरेश या जोडीने मिश्र गटात कझाकिस्तानचा १५६ -१५४ असा पराभव केला. माजी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अभिषेक वर्माने मोहित देशवालविरुद्ध स्थान मिळवून कंपाउंड वैयक्तिक स्पर्धेत पहिले पदक मिळवले होते. विश्व चॅम्पियनशीपमध्ये ३ वेळा रौप्य पदक विजेत्या ज्योतीने देखील कंपाऊंड स्पर्धेत उपांत्य फेरीत जागा मिळवली.


हे ही वाचा: Women’s Big Bash League: स्मृती मंधानाची शतकीय पारी; लीगमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय