घरक्रीडाकुस्तिगीर परिषदेतील वादावर शरद पवार स्पष्टच बोलले...

कुस्तिगीर परिषदेतील वादावर शरद पवार स्पष्टच बोलले…

Subscribe

७० वर्षांवरील पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही पदावर राहू नये, अशी सूचना एका केंद्रीय समितीने केली. त्यानंतर मी कोणत्याच संघटनेच्या कोणत्याच पदावर राहिलेलो नाही. मी सर्व पदांचा राजीनामा दिला. आता केवळ पाठिंंबा देतो. महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेतील वाद न्यायप्रविष्ट आहे. त्यावर आता भाष्य करणे योग्य नाही. पण असे वाद खेळाच्या परिषदेत नको. खेळाच्या परिषदेत केवळ खेळच करायला हवा, असे शरद पवार यांनी सांगितले. 

पुणेः महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेतील वाद हे अयोग्य आहेत. खेळाच्या परिषदेत असे वाद होता कामा नयेत. खेळाच्या परिषेदत केवळ खेळच झाला पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रीवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा वाद करणाऱ्यांचे कान टोचले.

ते म्हणाले, ७० वर्षांवरील पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही पदावर राहू नये, अशी सूचना एका केंद्रीय समितीने केली. त्यानंतर मी कोणत्याच संघटनेच्या कोणत्याच पदावर राहिलेलो नाही. मी सर्व पदांचा राजीनामा दिला. आता केवळ पाठिंंबा देतो. महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेतील वाद न्यायप्रविष्ट आहे. त्यावर आता भाष्य करणे योग्य नाही. पण असे वाद खेळाच्या परिषदेत नको. खेळाच्या परिषदेत केवळ खेळच करायला हवा, असे शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा सत्कार रविवारी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी शरद पवार म्हणाले, कुस्ती खेळणारे पैलवान हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असतात. त्यांना पाठबळ द्यायलाच हवे. त्यांना मिळणाऱ्या मानधनाच्या रक्केमत वाढ केली यासाठी राज्य शासनाचे कौतुकच करायला हवे. मात्र राक्षेने या स्पर्धेवर समाधान मानायला नको. त्याने अजून पुढे प्रगती करायला हवी. महाराष्ट्र केसरीनंतर राष्ट्रीय व आशिया स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करायला हवी. खाशाबा जाधव यांच्यानंतर कोणीच ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचलेले नाही. राक्षेने भारतासाठी ऑलिम्पिकचे पदक आणावे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्षपद पद शरद पवार सांभाळत होते. तर बाळासाहेब लांडगे गेली ४० वर्षांहून अधिक काळ या परिषदेचे सचिव होते. मात्र बाबासाहेब लांडगे हे मनमानी कारभार करत असल्याचे सांगत काही पैलवानांनी आंदोलन केले होते. तसेच भारतीय कुस्ती महासंघाकडे याची तक्रारही केली होती. हा वाद शिगेला पोहोचल्याने अखेर गेल्या वर्षी महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदच बरखास्त करण्यात आली. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहोचला.

- Advertisement -

देशातील कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा मोठा नावलैकिक आहे. महाराष्ट्रातील अनेक पैलवानांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा  गाजवल्या आहेत. महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेच्या माध्यमातून राज्यात १५ आणि २३ वयोगटातील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणे व अन्य त्यासंबंधित निर्णय घेतले जातात.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -