घरक्रीडाAb de Villiers Retiremen : एबी डिव्हिलियर्सच्या राजीनामा, अन् कोहली झाला भावूक

Ab de Villiers Retiremen : एबी डिव्हिलियर्सच्या राजीनामा, अन् कोहली झाला भावूक

Subscribe

विराट कोहलीने डिव्हिलियर्सच्या राजीनाम्यानंतर भावूक ट्विट करत त्याच्या साथीदाराच्या निर्णयाचे स्वागत केले आहे

मिस्टर ३६० डिग्री नावाने प्रसिध्द असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलिर्यसने क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने आधीच संन्यास घेतला होता. पण आता आयपीएलमध्ये देखील तो खेळणार नाही. डिव्हिलियर्सच्या राजीनाम्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक भावूक ट्विट करत त्याच्या साथीदाराच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. “डिव्हिलियर्स आमच्यासाठी सर्वात प्रेरणादायी खेळाडू असल्याचे कोहलीने ट्विटच्या माध्यमातून म्हटले. विराट आणि डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये मोठ्या कालावधीपासून आरसीबीसाठी खेळत आले आहेत. या दोघांच्या जोडीचा एक मोठा चाहता वर्ग आहे.

विराट कोहलीने ट्विटच्या माध्यमातून म्हटले की,”आमच्या वेळेचा सर्वात चांगला आणि प्रेरणादायी खेळाडू एबी डिव्हिलियर्स आहे त्याने जे काही केले ते आरसीबीला दिले आहे. आमचे आणि त्याचे खेळापलीकडचे नाते आहे आणि ते तसेच राहिल”. विराटने आणखी म्हटले की “हा एक हृदय पिळवटून टाकणारा निर्णय आहे, पण मला माहित आहे की त्याने हा निर्णय त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा विचार करून घेतला असेल. I Love You”. अशा शब्दांत विराटने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisement -

तर विराट कोहलीने केलेल्या ट्विटला प्रत्युत्तर देताना एबी डिव्हिलिर्यसने देखील त्याच शैलीत उत्तर दिले आहे. त्याने विराटच्या ट्विटला अनुसरून म्हटले, “I Love You too brother”

- Advertisement -

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स आरसीबीसाठी मोठ्या कालावधीपासून एकत्र खेळत आले आहेत. आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघातून बाहेर पडल्यानंतर डिव्हिलियर्स आरसीबीसोबत जोडला गेला होता आणि तेव्हापासून दोघेही खेळाडू सोबत एकत्र खेळत आहेत. कोहली आणि डिव्हिलियर्स दोघेही आरसीबीची ओळख आहेत. लक्षणीय बाब म्हणजे डिव्हिलिर्यसने ट्विटमध्ये म्हंटल्यानुसार तो पुढे देखील आरसीबीच्या संघासोबत राहणार आहे. जरी तो खेळणार नसला तरी संघासोबत असणार आहे.


हे ही वाचा: MS Dhoni : जबरा फॅन ! धोनीला पाहण्यासाठी तब्बल १४५० km चालला; माहीने दिले रिटर्न गिफ्ट


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -