IND vs NZ : कर्णधार रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला खेळाडूंना स्वातंत्र्य…

सलद दुसऱ्या सामन्यावर मिळवलेल्या विजयानंतर कर्णधार रोेहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे

रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरूध्द भारतीय संघाने सलग टी-२० सामने जिंकून टी-२० मालिकेवर कब्जा मिळवला आहे. तसेच मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार के. एल राहुलच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विजय मिळवला. विजयानंतर कर्णधार रोहितने खेळाडूंच्या प्रदर्शनावर आणि त्यांच्या क्षमतेवर भाष्य केले. संघाने कठीण परिस्थितीतून सावरताना चांगली खेळी केली आहे. त्यामुळे साहजिकच खेळाडूंना नवीन ऊर्जा मिळाली आहे. असे रोहितने सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

रोहित शर्माने म्हटले की, “आम्ही कठीण परिस्थिती चांगली खेळी केली आहे. न्यूझीलंडचा संघ शानदार आहे. सामन्यात बळी घेणे महत्त्वाचे होते जे आम्हाला सामन्यात पकड मजबूत करण्यात मदतशीर होऊ शकले असते. आमच्यामध्ये क्षमता चांगली आहे नवीन खेळाडू सलग क्रिकेट खेळत आले आहेत”.

रोहितने सांगितले की कर्णधार म्हणून माझे हेच काम आहे की नव्या खेळांडूना सतत उत्साह आणि प्रेरणा देत राहणे. जेव्हा पण ते खेळायला येतील तेव्हा त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. बाकी बाहेरील गोष्टींची काळजी करू नका, त्यामुळे मैदानावर येताच फक्त खेळाबाबत विचार केला पाहिजे, असे रोहितने सांगितले.

खेळांडूच्या क्षमतेवर रोहितने सांगितले, या संघात खूप युवा खेळांडूचा समावेश आहे, काही खेळांडू खूप कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर काही खेळाडू चांगल्या संधीची वाट बघत आहेत. पण त्यांची वेळ नक्की येईल, आम्ही प्रयत्न करणार आहोत की प्रत्येकाला संधी कशी मिळेल. मात्र कोणताही खेळाडू सध्या मैदानात असला तर त्याचे पूर्ण प्रयत्न असला पाहिजे की तो त्याचे काम पूर्ण करेल. असे आणखी बोलताना रोहितने म्हटले.

लक्षणीय बाब म्हणजे न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेसाठी कित्येक खेळांडूना विश्रांती देण्यात आली आहे. टी-२० सामन्यांचे कर्णधारपद सोडलेला विराट कोहली देखील न्यूझीलंडविरूध्च्या मालिकेचा हिस्सा नाही. अशातच कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळत असलेल्या भारतीय संघात नवीन युवा खेळांडूना संधी मिळत आहे. पहिल्या सामन्यात व्यंकटेश अय्यरने डेब्यू केला होता तर दुसऱ्या सामन्यात हर्षल पटेलने आपल्या डेब्यू सामन्यात २ बळी घेतले.