Racism : वर्णद्वेष प्रकरणी अखेर खेळाडूने मागितली चेतेश्वर पुजाराची माफी

भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा खेळाडू चेतेश्वर पुजाराला देखील वर्णद्वेषाचे बळी व्हावे लागले होते

खेळात वर्णद्वेषाला कोणतेच स्थान नसते, मात्र वेळोवेळी या बाबतची नवीन प्रकरणे समोर येत असतात. भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा खेळाडू चेतेश्वर पुजाराला देखील वर्णद्वेषाचे बळी व्हावे लागले होते. २०१५ मध्ये यॉर्कशायर काउंटीकडून खेळताना पुजाराला त्याच्या एका सहकारी खेळाडूने वर्णद्वेषावरून स्टीव्ह म्हणत डिवचले होते. तर आता सॉमरसेटचा वेगवान गोलंदाज जॅक ब्रूक्सने पुजाराला स्टीव्ह म्हटल्याबद्दल माफी मागितली आहे. त्यावेळी ब्रूक्स फक्त यॉर्कशायर काउंटीसाठी क्रिकेट खेळत होता. सोबतच ब्रूक्सने २०१३ मध्ये केलेल्या वर्णद्वेषावरील ट्विटवरून दिलगीरी व्यक्त केली आहे. ब्रूक्सवर इंग्लिश वेगवान गोलंदाज टायमल मिल्स आणि ऑक्सफर्डशायरकडून मायनर काऊंटी क्रिकेट खेळणारा स्टीवर्ट लॉडॅट यांच्याविरुद्ध देखील वर्णद्वेषावरून शब्द वापरल्याचा आरोप आहे. वर्णद्वेष ही समाजातील ठरावीक लोकांविरुद्ध भेदभाव करण्याची एक पद्धत आहे.

डिजिटल, संस्कृती, मीडिया आणि क्रीडा निवड समितीसमोर अझीम रफिकच्या माहितीनुसार ब्रूक्सचे नाव देण्यात आले होते. रफिक म्हणाला की ब्रूक्सने पुजाराला स्टीव्ह म्हणण्यास सुरूवात केली होती. ब्रूक्सने सांगितले की, “अजीम रफिकने या आठवड्यात कायदे करणाऱ्यांना दिलेल्या निवेदनात माझ्या नावाच्या बाबतीत स्टीव्ह नावाचा वापर काही लोकांशी संबंधित आहे आणि त्याबाबत बोलणे म्हणजे कठीण आहे. हे पूर्वी ड्रेसिंग रूममधील एक भाग होता जे सामान्य आहे. त्याचा कोणत्याही पंथ किंवा जातीशी संबंध नाही”.

ब्रूक्सने आणखी सांगितले, “मी याबाबत केलेल्या वक्तव्याची कबुली देत आहे आणि मला वाटते की असे काही बोलणे अपमान केल्यासारखे आणि चुकीचे आहे. मी पुजाराशी संपर्क साधून त्याच्या परिवाराबद्दल कोणत्याही अपमानित भाष्याबदद्ल माफी मागितली आहे. त्यावेळी मी याला वर्णद्वेषाच्या रूपात पाहत नव्हतो पण आता मला माहित आहे हे चुकीचे आहे”.

सॉमरसेटनेदेखील बोलताना सांगितले की तो या प्रकरणाकडे पाहत आहे. क्लबने म्हटले की, “रविवारी संध्याकाळी उशिरा सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लबला आमचा एक खेळाडू जॅक ब्रूक्स याने केलेल्या आरोपांची जाणीव करून देण्यात आली आहे. ते तेव्हा झाले जेव्हा तो यॉर्कशायर सीसीसीसाठी खेळत होता. एका तपासाला लगेच सुरूवात झाली होती आणि ती अद्याप चालू आहे”.


हे ही वाचा: Tim Paine ‘sexting’ case: टिम पेनचे Sexting Scandal उघडकीस, दिला राजीनामा